शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

गांजामाफिया ‘टारझन’ गजाआड

By admin | Updated: August 31, 2016 03:43 IST

अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. स्वत:ला टारझन म्हणवून घेणाऱ्या गांजामाफिया हरिदास विधातेला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे

नामदेव मोरे,  नवी मुंबई अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. स्वत:ला टारझन म्हणवून घेणाऱ्या गांजामाफिया हरिदास विधातेला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून अर्धा किलो गांजा हस्तगत केला आहे. याशिवाय सानपाडा महामार्गानजीक झोपडीत गांजा विकणारा माफिया अशोक पांडे यालाही अटक केली असून या सर्वांची कसून चौकशी सुरू केली आहे. नवी मुंबईमधील गांजा विक्री व अवैध व्यवसायांविरोधात ‘लोकमत’ने मोहीम सुरू केली होती. दोन वेळा स्टिंग आॅपरेशन करून नेरूळ, एपीएमसीचे भाजी व फळ मार्केट, धान्य मार्केटसमोरील झोपडी, महामार्गावरील झोपडीमध्ये गांजा विकला जात असल्याचे उघडकीस आणले होते. अमली पदार्थ विक्रेते तरूणांना व्यसनांच्या जाळ्यात ओढत असल्याचेही पाहणीमध्ये निदर्शनास आले होते. अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनीही जूनपासूनच अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत त्यांनी १२ ठिकाणी धाडी टाकून १५पेक्षा जास्त आरोपींना गजाआड केले आहे. एपीएमसीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये गेली १५ वर्षांपेक्षा जास्त काळ हरिदास विधाते याला अटक केली आहे. त्याच्याकडे अर्धा किलो गांजा सापडला आहे. विधाते हा स्वत:ला टारझन म्हणून घेतो. आय एम टारझन अशा शब्दात तो अनेक वेळा ओळखीच्यांवर रूबाब झाडत होता. मार्केटमध्ये परप्रांतीय मुलांकडून तो गांजा विक्री करून घेत होता. त्याचा मुलगा दत्तात्रय विधाते यालाही गांजा विक्रीप्रकरणी यापूर्वीच अटक केली होती. सद्यस्थितीमध्ये त्याला तडीपार केले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने गांजामाफिया अशोक पांडे यालाही अटक केली आहे. परंतु त्याच्याकडे गांजाचा साठा सापडला नाही. गांजा ओढत असताना तो पोलिसांना आढळला. यामुळे गांजा जवळ बाळगला व अमली पदार्थांचे प्राशन केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला आहे. पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे शहरातील बहुतांश प्रमुख अड्डे बंद झाले आहेत. परंतु धान्य मार्केटसमोर झोपडपट्टीमध्ये व नेरूळमध्ये पोलिसांच्या नजरा चुकवून अधूनमधून गांजा विक्री होत आहे. त्यांच्यावरही पोलिसांची नजर आहे. टारझन व अशोकला अटक केल्यामुळे गांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कारवाईच्या भीतीने एपीएमसीमधील राजाने गांजा विक्री थांबविली आहे. त्याचे साथीदारही गायब आहेत. एपीएमसी प्रशासनानेही त्याला मार्केटमध्ये काहीही चुकीचे काम करताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पोलिसांची ही मोहीम अशीच सुरू राहिली तर काही महिन्यात शहर अमली पदार्थांच्या विळख्यातून सुटू शकेल, असे मत दक्ष नागरिक व्यक्त करत आहेत. अशोकचा अड्डाही जुनाच शहरातील जुन्या गांजामाफियांमध्ये अशोक पांडेचाही समावेश आहे. सायन - पनवेल महामार्ग व कोल्ड स्टोरेजच्या मध्ये असलेल्या झोपडीत तो गांजाची विक्री करत होता. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. परंतु तो नंतर सुटून आला व पुन्हा गांजा विक्री सुरू केली होती. पोलिसांना सापडू नये यासाठी एका जागेवर साठा ठेवत नव्हता. पोलीस त्याच्यावर पाळत ठेवून होते अखेर गांजा विकताना नाही पण ओढताना तो पोलिसांना आढळताच त्याला तत्काळ अटक केली आहे.