शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

सोनपावलांनी शहरात झाले गौरीचे आगमन; कोरोनामुळे ऑनलाइन खरेदीला महिलांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 00:09 IST

एपीएमसी मार्केटमध्ये गजबज नाही

अनंत पाटील 

नवी मुंबई : शहरात दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिल्यानंतर, मंगळवारी, २५ आॅगस्ट रोजी सोनपावलांनी आलेल्या गौरी मातेचे आगमन झाले. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक महिलांनी आॅनलाइन खरेदीला पसंती देत, गौरीसाठी वस्तू मागविल्या.नवी मुंबई आणि रायगड परिसरात गौरीचे मंगळवारी सकाळीच आगमन झाले आहे. या वर्षी गौरीपूजन अगदी साधेपणाने करावे लागणार आहे. दरवर्षी गौरीच्या माहेरपणाच्या कौतुकाचे वातावरण आपोआप तयार होते. माहेरवाशीण डोक्यावर सूप घेऊन गौरीला घरभर चालवते. तशी हाताने पावलेही उमटवली जातात. ही पावले तितकीच साजिरी भासतात. यानंतर, गौरीचा मांडव सजविला जातो. फळे, भाज्या, फुले या मांडवाला लावले जाते. दुसऱ्या दिवशी गौरीची साग्रसंगीत पूजा केली जाते. आता शाडू मातीची मूर्ती बनवून घेतात. काही ठिकाणी गौरी विसर्जनाच्या दिवशी विसर्जनासाठी तेरड्याची खास गौरी केली जाते.

कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर एपीएमसी बाजारपेठ नेहमीप्रमाणे गजबजलेली नव्हती. त्यामुळे महिला वर्ग साहित्यांच्या शोधात असल्याचे दिसून आले, तर छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनीही आॅनलाइन मार्ग निवडला आहे. महिलांच्या पसंतीस पडतील, अशा विविध प्रकारांतील नऊवारी साड्या येवला आणि सुरत येथून उपलब्ध केल्याची माहिती कोपरखैरणे गावच्या ज्येष्ठ महिला सुनंदा भरत पाटील यांनी दिली.महिलांची निराशागौराईचा सण हा माहेरवाशिणींचा समजला जातो. मुखवटे तयार करणे, तिला नव्या नवरीप्रमाणे सजविणे, तिच्यासाठी सौभाग्याचे वाण तयार करणे, या कामात महिलांची धांदल उडते. दुसºया दिवशी पूजनाचा वेगळा थाट असतो. नारळाच्या करंज्या, पुरणपोळ्यांचा बेतही असतोच. ही रात्र जागवली जाते. पारंपरिक गाणी, नृत्य आणि आता ब्रास बँड, डीजेच्या तालावर महिला थिरकतात. मात्र, कोरोनाचे सावट असल्याने महिलांची पार निराशा झाली आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव