शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सारसोळेमधील उद्यानातील खेळण्यांची झाली दुरवस्था

By admin | Updated: April 19, 2017 00:51 IST

सारसोळे सेक्टर ६ मधील राजमाता जिजाऊ उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या खेळण्यांमुळे गत आठवड्यात दोन मुले

नवी मुंबई : सारसोळे सेक्टर ६ मधील राजमाता जिजाऊ उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या खेळण्यांमुळे गत आठवड्यात दोन मुले जखमी झाली आहेत. पालिकेने तत्काळ उपाययोजना केल्या नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिक व लोकप्रतिनिधींनी दिला आहे. नवी मुंबई महापालिकेने शहरात जवळपास २०० उद्याने तयार केली आहेत. उद्यानांमध्ये मुलांसाठी खेळणी बसविण्यात आली आहेत. पण त्या खेळण्यांची योग्य देखभाल व दुरुस्ती केली जात नाही. सर्वसामान्य नागरिकांची वसाहत असलेल्या परिसरातील उद्यानांची व खेळण्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली असून यामध्ये सारसोळे सेक्टर ६ मधील राजमाता जिजाऊ उद्यानाचा समावेश आहे. सारसोळे गाव, विस्तारित गावठाण व सिडकोनिर्मित इमारतींमधील नागरिकांसाठी हे एकमेव उद्यान आहे. वास्तविक हे उद्यान फक्त नावापुरतेच शिल्लक आहे. त्याची स्थिती मैदानासारखी झाली आहे. वर्षभरापासून येथील खेळणी तुटली आहेत. झोपाळे गायब झाले आहेत. खेळण्यांचा वापर केल्यास अपघात होवून मुले जखमी होत आहेत. रविवारी गर्दी असल्याने येथे दोन मुले जखमी झाली आहेत. नियमितपणे अशाप्रकारे घटना घडू लागल्या आहेत. सारसोळेमधील उद्यानाविषयी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते नीलेश दौंडकर यांनी नगरसेवक सूरज पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. पाटील हे स्वत: जवळपास एक वर्षापासून पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहेत. १५ दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या ही स्थिती निदर्शनास आणून दिली आहे. तत्काळ नवीन खेळणी बसविण्यात यावीत व जोपर्यंत नवीन खेळणी येत नाहीत तोपर्यंत तुटलेली खेळणी हलविण्याची मागणी केली आहे. परंतु पालिका प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. यामुळे जर पुन्हा कोणी मुलगा खेळताना जखमी झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी पालिका अधिकाऱ्यांची राहील असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)