शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उद्यान विभागाची झाडाझडती

By admin | Updated: June 22, 2017 00:29 IST

उद्यान निर्मिती व देखभाल दुरुस्तीवर प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. परंतु सद्यस्थितीमध्ये उद्यानांची योग्य देखभाल केली जात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उद्यान निर्मिती व देखभाल दुरुस्तीवर प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. परंतु सद्यस्थितीमध्ये उद्यानांची योग्य देखभाल केली जात नाही. वृक्ष सुकत आहेत. खेळण्यांची व बैठक व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाचे नियंत्रण राहिलेले नाही. देखभालीची सक्षम यंत्रणाच नाही. उद्यानांमध्ये लाल माती, खत पुरविण्याच्या कामांचीही चौकशी करण्यात गरज असल्याची मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये केली आहे. आयुक्तांच्या अधिकारामध्ये शहरातील उद्यानांची देखभाल व दुरूस्ती नवीन उद्यानांची निर्मिती करण्यासाठी केलेल्या खर्चाचे विवरण माहितीसाठी सादर करण्यात आले हाते. ३७ ठिकाणी केलेल्या कामांवर ४ कोटी ३१ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. या विषयांच्या अनुषंगाने नगरसेवकांनी शहरातील उद्यानांच्या स्थितीवर लक्ष केंद्रित केले. माजी उपमहापौर अंकुश गावडे यांनी उद्यानांचे संवर्धन म्हणजे नक्की काय असा प्रश्न उपस्थित केला. शहरामध्ये अनेक ठिकाणी दुकानांसमोरील वृक्ष सुकले आहेत. काही ठिकाणी पेट्रोल व इतर इंधन टाकून वृक्ष सुकविण्यात आले आहेत. हे वृक्ष नक्की कशामुळे सुकले याची चौकशी झाली पाहिजे. अनेक ठिकाणी उद्यानांमध्ये वृक्ष सुकले आहेत. खेळण्यांची दुरवस्था झालेली आहे. बैठक व्यवस्थेसाठीचे बाकडे तुटले आहेत. देखभाल करणारा ठेकेदार त्यांची जबाबदारी फक्त वृक्ष संवर्धनाची असल्याचे सांगत असल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनीही उद्यान विभागामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले. उद्यानामध्ये किती माती टाकली, शेणखत किती टाकले याची चौकशी केली पाहिजे. उद्यानांमध्ये होणाऱ्या कामांची देखभाल होत नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही देखभाल दुरूस्तीचे सर्वसमावेशक कंत्राट काढताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे मत व्यक्त केले. सीबीडीमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक अशोक गुरखे यांनी उद्यान विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कामे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. परंतु प्रत्यक्षात होणारी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी योग्य यंत्रणा नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. धोकादायक वृक्ष तोडण्यासाठी यंत्रसामग्री नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सानपाडा परिसरामध्ये उद्याने भरपूर आहेत, परंतु त्यामध्ये अत्यावश्यक कामे करण्यासाठी विनंती केल्यानंतरही प्रशासन लक्ष देत नसल्याची नाराजीही व्यक्त केली. घणसोली व नेरूळ पूर्व परिसरात उद्याने निर्माण करण्याची मागणी प्रशांत पाटील व मीरा पाटील यांनी केली. उपआयुक्त तुषार पवार व अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी सदस्यांनी सुचविलेल्या मुद्यांचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट केले.