शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्यालय परिसरात कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 00:22 IST

नागरिक नाराज; स्वच्छता अभियानाकडे होत आहे दुर्लक्ष

नवी मुंबई :  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्यालय इमारतीच्या आवारात कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. खराब झालेले टायर, वापरात नसलेल्या मोटरसायकल, फर्निचर ठेवण्यात आले आहेत. यामुळे स्वच्छतेला अडथळा निर्माण होत असून स्वच्छता अभियानादरम्यान तरी येथील कचरा उचलण्यात यावा अशी मागणी होत आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानाला शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडून अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अनेक सरकारी कार्यालयांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्यालयाच्या इमारतीच्या वाहनतळ परिसरातील कचरा अनेक वर्षांपासून हटविला जात नाही. या ठिकाणी बाजार समितीच्या वाहनांचे वापर करून झालेले टायर टाकण्यात आले आहेत. कार्यालयातील फर्निचरचा कचराही याच ठिकाणी टाकण्यात आला आहे. बाजार समिती कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वापरात नसलेल्या मोटरसायकलही या ठिकाणी उभ्या केल्या आहेत. यामुळे वाहनतळ परिसराला गोडाऊनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुख्यालय इमारतीच्या मागील बाजूला जुने पत्रे व बांधकामाचे साहित्यही ठेवण्यात आले आहे. सांडपाणीही वाहून नेणारी वाहिनी फुटल्यामुळे पाणी वरती येत आहे. बाजार समिती प्रशासनाने कांदा-बटाटा मार्केटच्या लिलावगृहाजवळ स्वच्छता अभियानाचे बॅनर लावले आहेत. परंतुु प्रत्यक्षात मात्र अभियान गांभीर्याने राबविले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.मार्केटमध्येही श्रमदान करण्याची मागणीमुंबई बाजार समितीमध्ये प्रशासन व व्यापारी, कामगार यांचा स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय सहभाग हवा आहे. यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वच्छता अभियान राबविणे आवश्यक आहे. या अभियानामध्ये कोणती कामे करायची याचेही नियोजन करणे आवश्यक आहे. प्रशासन व संचालक मंडळाने यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती