शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीत पदपथांवर कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 04:07 IST

स्वच्छतेचा बोजवारा : नागरी आरोग्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; रस्त्यांवर कचºयाचे ढीग

नवी मुंबई : सर्वेक्षण संपल्यानंतर शहरातील स्वच्छतेकडे अधिकारी कर्मचारी यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरात अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग पाहायला मिळत असून, पालिकेनेच छाटलेल्या झाडांच्या फांद्या पदपथांवर पडून आहेत. यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, पदपथांवर पादचाºयांची अडवणूक होत आहे.स्वच्छतेच्या बाबतीत शहर देशात अव्वल ठरावे, यासाठी मागील महिन्यात प्रशासनाकडून अनेक प्रयत्न झाले. मात्र, समितीकडून शहराची पाहणी झाल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून केवळ सर्वेक्षणाला सामोरे जाण्यासाठी पालिकेकडून शहरात स्वच्छतेचा दिखावा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घणसोली नोडमध्ये अनेक दिवसांपासून जागोजागी कचºयाचे ढीग पाहायला मिळत आहेत. काही सोसायटींच्या बाहेरच उघड्यावर कचरा साठवला जात आहे. तर ज्या ठिकाणी घनकचरा वाहतूक करणारे वाहन थांबवले जाते, त्या ठिकाणी वाहनातून सांडणारे घाण पाणी साचत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. अशाच प्रकारे ए.एस.पी. शाळेसमोर घरोंदा वसाहतीमध्ये पालिकेनेच पदपथ अडवून ठेवले आहेत. परिसरातील वृक्षांच्या छाटलेल्या फांद्या पदपथावर साठवल्या आहेत. मागील कित्येक दिवसांपासून हा कचरा ठिकठिकाणी साचलेला आहे; परंतु रस्ते सफाई करताना सफाई कामगारांकडून तो उचलला जात नाही. यामुळे नागरिकांना पदपथावरून चालता येत नसल्याने गैरसोय होत आहे. कचरा कुजत चालल्याने दुर्गंधी पसरत असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा संताप सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. स्वप्निल जगताप यांनी व्यक्त केला.तक्रारींची दखल नाहीपाल्यांना शाळेत सोडण्यासाठी येणाºया पालकांनाही याचा त्रास होत आहे. यासंदर्भात त्यांनी पालिकेच्या अधिकाºयांकडे अनेकदा तक्रार केली; परंतु केवळ ठरावीकच बाबींना प्राधान्य देणारे प्रशासन घणसोलीत नागरी समस्या सोडवण्याकडे फारसे लक्ष देत नसल्याचीही खंत सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. स्वप्निल जगताप यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई