शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात महिला टोळीचा धुमाकूळ

By admin | Updated: May 22, 2016 02:04 IST

विविध गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या चार महिलांना सानपाडा पोलीसांनी अटक केली आहे. रात्रीच्यावेळी मद्यपींना लुटण्यासह दुकानांमध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करण्याचे काम या महिला करायच्या.

नवी मुंबई : विविध गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या चार महिलांना सानपाडा पोलीसांनी अटक केली आहे. रात्रीच्यावेळी मद्यपींना लुटण्यासह दुकानांमध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करण्याचे काम या महिला करायच्या. त्यापैकी काहींवर यापुर्वी देखिल गुन्हे दाखल आहेत.रात्रीच्या वेळी मद्यपान करुन घरी चाललेल्या आरटीओ दलालाला लुटल्याची घटना सानपाडा पुलालगत घडली होती. घटनेनंतर सदर दलालाने वेळीच संपुर्ण प्रकाराची माहिती सानपाडा पोलीसांना दिलेली. त्यानुसार लुटारुंच्या शोधात पोलीस असताना दोन महिलांची टोळी त्यांच्या हाती लागली. बबीता हंगीरगे व मुक्ता घनराज असे दोघींचे नाव आहे. त्या कळंबोली परिसरातील झोपडपट्टीत राहनारया आहेत. त्यांच्यावर यापुर्वी देखिल खारघर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल आहे. या दोघी रात्रीच्या वेळी रस्त्याने चालेल्या मद्यपींचा शोध घ्यायच्या. त्यानंतर डुलत चालेल्या मद्यपीला एकांतात गाठून त्याच्याकडील रक्कम व ऐवज लुटायच्या असे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा होडगे यांनी सांगितले. अशाच प्रकारे त्यांनी कलीम खान यांना लुटले होते. या प्रकारात त्यांच्याकडील ९ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली होती.याचदरम्यान सानपाडा रेल्वेस्थानक परिसरातील दुकानात भरदिवसा चोरीची घटना घडली होती. ग्राहकांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने गल्यातील रक्कम पळवली होती. सदर गुन्ह्याची नोंद सानपाडा पोलीसठाण्यात झाली असता पोलीसांनी दुकानातील सिसिटीव्ही तपासले. यावेळी दोन महिलांनी त्यांच्यासोबतच्या लहाण मुलींमार्फत त्याठिकाणी चोरी केल्याचे आढळून आले. सदर महिला भिक मागण्याच्या बहाण्याने दुकानात आल्या होत्या. यामुळे त्यांना शोधायचे कुठे असा प्रश्न सानपाडा पोलीसांपुढे उपस्थित झाला होता. अखेर त्यांची छायचित्रे सर्व पोलीसठाण्यांमध्ये माहितीकरिता पाठवण्यात आली होती. दरम्यान तशाच वर्णनाच्या महिला कोपर खैरणे तिन टाकी परिसरात वावरत असल्याची माहिती सानपाडा पोलीसांना मिळाली. यानुसार त्यांनी सदर ठिकाणी जावुन त्यांची ओळख पटवुन ताब्यात घेतले. यावेळी त्या महिलांनी पोलीसांच्या तावडीतुन सुटका करुन घेण्यासाठी किळसवाने व घाणेरडे प्रकार देखिल केले. कविता राठोड व मिनाक्षी पवार अशी त्यांची नावे असुन दोघीही शिवडी रेल्वेस्थानक लगतच्या झोपडपट्टीतील राहणारया आहेत. भिक मागण्याच्या बहाण्याने दुकानात गेल्यानंतर गर्दीची संधी साधुन राठोड व पवार दुकानमालकाचे स्वतकडे लक्ष आकर्षित करायच्या. याचवेळी तिच्या दोनपैकी एक मुलगी गल्यातील रक्कम चोरुन निघुन जायची. त्यानुसार या चौघींनाही अटक केल्याचे होडगे यांनी सांगितले.