शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कामोठेतील बिल्डरला लुटणारी टोळी गजाआड

By admin | Updated: January 10, 2017 06:57 IST

पिस्तूलचा धाक दाखवून कामोठेमधील बिल्डरला लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : पिस्तूलचा धाक दाखवून कामोठेमधील बिल्डरला लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तूलसह लुटलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेले तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मोकाअंतर्गत कारवाईही झालेली आहे.कामोठे येथील बिल्डरच्या कार्यालयात घुसून अज्ञातांनी जबरी दरोडा टाकल्याची घटना गतमहिन्यात घडली होती. या प्रकरणी सखोल तपासाअंती गुन्हे शाखेच्या कक्ष २ च्या पथकाने तिघांना अटक केली आहे. प्रशांत ठाकूर (२३), विक्रांत चव्हाण (३१) व प्रशांत म्हात्रे (२८) अशी त्यांची नावे आहेत. तिघेही सराईत गुन्हेगार असून अनुक्रमे ठाणे, घणसोली व कामोठे येथील राहणारे आहेत. दरम्यान वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांना सदर टोळीची माहिती मिळाली असता, सहायक निरीक्षक बबन जगताप, किरण भोसले, सुभाष पुजारी, हवालदार विजय आयरे, सुनील कानगुडे यांचे पथक पाळत ठेवून होते. अखेर ते तिघेही घणसोलीत येणार असल्याची माहिती मिळताच गावदेवी मंदिराच्या परिसरातून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर दरोडे, हत्या, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यानुसार प्रशांत ठाकूर, विक्रांत चव्हाण यांच्यावर यापूर्वी मोका अंतर्गतही कारवाई करण्यात आलेली आहे. झडतीमध्ये या तिघांकडून १० लाख ५० हजार रुपये किमतीचे ३६९ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३२ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम, चार मोबाइल तसेच देशी बनावटीचे पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे असा ११ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले. याप्रसंगी उपआयुक्त दिलीप सावंत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)च्तिघेही सराईत गुन्हेगार असून ठाणे, घणसोली व कामोठे येथे राहणारे आहेत. त्यांनी कामोठे येथील बिल्डरच्या कार्यालयात घुसून पिस्तूलचा धाक दाखवून दागिने लुटले होते. या प्रकारामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे डोके वर काढू पाहत असलेल्या टोळीच्या शोधाकरिता उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ च्या पथकाने कंबर कसली होती.