शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

गांधी उद्यानाचा लवकरच कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 03:48 IST

दीड कोटींचा खर्च : अ‍ॅम्पी थिएटरसह इतर सुविधा देणार

वैभव गायकर

पनवेल : शहरातील देवाळे तलावाचे बुधवारी रायगड जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झाले. सुमारे १ कोटी ९७ लाख रु पये खर्चून या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. याच धर्तीवर तलावाशेजारी असलेल्या महात्मा गांधी उद्यानाचे देखील सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

आयुक्त गणेश देशमुख यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती दिली. पनवेलच्या एका टोकाला असलेल्या या उद्यानात नागरिकांना आपला वेळ घालवता यावा याकरिता हे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तलावात असलेले कारंजाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी याठिकाणी अ‍ॅम्पी थिएटर देखील उभारले जाणार आहे. याकरिता सुमारे दीड कोटी रु पये खर्च केला जाणार आहे. या सुशोभीकरणात महात्मा गांधी उद्यानाचे रूपडे पूर्णपणे पालटणार आहे. या सुशोभीकरणामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची उंची देखील वाढविणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले. या उद्यानात शोभेची झाडे देखील लावली जाणार आहेत. लवकरच यासंदर्भात आराखडा तयार करून लवकरच तो मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवला जाणार आहे. यानंतर रीतसर निविदा काढून हे काम पूर्ण केले जाणार आहे. शहरातील उद्याने आदी ठिकाणी नागरिक दोन क्षणाची उसंत घेण्यासाठी जात असतात. या ठिकाणांचे योग्य सुशोभीकरण केल्यास नागरिकांना देखील प्रसन्न वाटेल. लवकरच हे काम हाती घेतले जाणार आहे अशी प्रतिक्रिया आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई