शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

‘रोहयो’साठी निधी कमी पडणार नाही

By admin | Updated: March 17, 2017 05:54 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही. परिणामी, अधिकाधिक कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत

अलिबाग : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही. परिणामी, अधिकाधिक कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. कामे घेताना काही निकष अडचणीचे ठरत असतील, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या निकषात बदल करता येतील, असे निर्देश केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्र ममंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी येथे बोलताना दिले.केंद्र सरकार पुरस्कृत योजनांतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी रायगड जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात गीते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रायगड जिल्ह्यात मनरेगाची ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून ४ हजार ९२ तर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून २ हजार ५९५ अशी एकूण ६ हजार ६८७ कामे प्रस्तावित असून त्यापैकी १४४ कामे जिल्ह्यात प्रत्यक्ष सुरू आहेत. योजनेच्या निकषांमधील काही अडचणींमुळे कामे होऊ शकत नसल्याचे बैठकीत लक्षात आल्यावर गीते यांनी निकष बदलाबाबत निर्देश दिले आहेत. जनकल्याणासाठी केंद्र शासनामार्फत अर्थसाहाय्य असलेल्या अनेक योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून योजना अधिकाधिक लाभधारकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी उपयुक्त आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी भाग घ्यावा. योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१८ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे नियोजन आहे. यादृष्टीने संबंधित यंत्रणेने काम करावे, असेही गीते यांनी सांगितले.प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुरू असलेली कामे मे २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच जी कामे अद्याप सुरू नाहीत ती तत्काळ सुरू करावीत, असे त्यांनी सांगून जिल्ह्यात असलेल्या खाड्यांमधून जलप्रवासी वाहतूक करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस पंचायत समित्यांचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, समितीचे सदस्य तसेच जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच जिल्ह्यातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांनी आभार मानले.