शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यातून इंधन निर्मिती प्रकल्प सुरू

By admin | Updated: February 1, 2016 01:42 IST

‘टाकाऊतून टिकाऊ’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी कचऱ्यातून इंधन निर्मिती, जैविक खत तसेच गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पाला सानपाड्यात सुरुवात झाली आहे

प्राची सोनवणे ल्ल नवी मुंबई‘टाकाऊतून टिकाऊ’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी कचऱ्यातून इंधन निर्मिती, जैविक खत तसेच गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पाला सानपाड्यात सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे ओला कचरा, निर्माल्य, झाडाचा पालापाचोळा या अशा टाकाऊ कचऱ्यातून खत आणि इंधन तयार केले जाणार आहे. परिसरातील नागरिकांना प्रकल्पाचा लाभ घेता येणार, हरित नवी मुंबई प्रकल्पालाही हातभार लावला जाणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका आणि निसर्गप्रेमी फाऊंडेशनच्या वतीने सानपाडा परिसरातील पर्यावरणस्नेहींनी एकत्र येऊन या प्रकल्पाला सुरुवात केली असून गेली १० वर्षे या संघाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहे. महापौर सुधाकर सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ करुन टाकाऊतून टिकाऊ या प्रकल्पाला खरी सुरुवात झाली आहे. सानपाडा रेल्वे स्थानकालगत असलेल्या ओसाड जमिनीवर वृक्षलागवड करुन त्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी दोन निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून त्यामध्ये जमा होणाऱ्या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात खतनिर्मिती केली जात आहे. तसेच या ठिकाणी बायोवेस्ट कंपोस्टिंग मशीन, काडीकचरा इंधननिर्मिती यंत्रही येथे ठेवण्यात आले आहे. यातून निर्माण झालेले खत नागरिकांना मोफत दिले जाणार असून प्रत्येकाला घरी झाडे लावण्याचे आवाहनही केले जात आहे. शालेय अभ्यासक्रमातील विज्ञान विषयात असलेल्या कंपोस्ट खत कसे तयार करतात, इंधननिर्मिती कशी केली जाते याबाबतही विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहण्याची संधी दिली जाणार असल्याचे निसर्गप्रेमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील नाईक यांनी सांगितले. उपक्रमांतर्गत सानपाड्यातील सर्वच सोसायट्यांमधील कचरा, निर्माल्याच्या माध्यमातून खतनिर्मिती तसेच इंधन निर्मितीचा प्रकल्प राबविला जात आहे. नाला, तलाव, समुद्रकिनारी निर्माल्य टाकल्याने शहराचे विद्रूपीकरण तर होतेच त्याबरोबर या नैसर्गिक घटकांचेही प्रदूषण होत असल्याने हा उपक्रम फायदेशीर ठरणार असल्याची माहिती या संघटनेने दिली. शहरातील इतरही विभागांमध्ये अशाप्रकारचा उपक्रम राबवायचा असेल तर या निसर्गप्रेमी फाऊंडेशच्या सदस्यांच्या मदतीने नागरिकांना परिसरातही हा उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि साहित्य पुरविण्याचे आवाहन या निसर्गप्रेमींनी केले आहे. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे, स्थानिक नगरसेविका रुचा पाटील, उपआयुक्त बाबासाहेब राजाळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. एस.व्ही. पत्तीवार आदी उपस्थित होते.