शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एमजेपीच्या जलवाहिनीला वारंवार फुटीचे ग्रहण

By admin | Updated: March 31, 2017 06:42 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला फुटीचे ग्रहण लागले आहे. कळंबोली परिसरात गुरु वारी वाहिनी फुटल्याने

कळंबोली : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला फुटीचे ग्रहण लागले आहे. कळंबोली परिसरात गुरु वारी वाहिनी फुटल्याने वसाहतीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत ही तिसरी घटना असल्याने रहिवासी त्रस्तआहेत. सिडको प्रशासन मात्र एमजेपीकडे बोट दाखवून नामानिराळे होत आहे.एमजेपीची भोकरपाडा येथील जलशुद्धिकरण केंद्रातून सिडको वसाहतींना पाणीपुरवठा करणारी वाहिनी जीर्ण झालेली आहे. त्यामुळे जलवाहिनी फुटणे आणि लाखो लिटर पाणी वाया जाणे, ही बाब नित्याचीच झाली आहे. वारंवार वाहिनी फुटल्याने वसाहतींमध्ये पाणीटंचाई निर्माण होत आहे. सिडकोची स्वत:ची यंत्रणा नसल्याने एमजेपीवर तहान भागविण्यासाठी अवलंबून राहावे लागत आहे. ही वाहिनी बदलण्यासाठी एमजेपीने सिडको, जेएनपीटी, पनवेल महापालिका या ग्राहक संस्थांकडे भागभांडवलाची मागणी केली होती. सिडकोने सुरु वातीला आपला हिस्सा देण्याकरिता संचालक बोर्डाच्या बैठकीत मंजुरी घेतली होती; परंतु महापालिका झाल्याने सिडकोने हात वर केले आहेत. त्यामुळे नवीन जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. वारंवार वाहिन्या फुटल्याने पनवेल शहरासह कळंबोली नवीन पनवेलला पाणी मागणीप्रमाणे देता येत नाही.गुरु वारी कळंबोली परिसरात पुन्हा एमजेपीची वाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे दिवसभर पाणी आले नाही. परिणामी, कळंबोलीकरांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.कळंबोली जवळ एमजेपीची पाइप लाइन फुटली. त्यामुळे वसाहतीला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. संध्याकाळपर्यंत वाहिनी दुरु स्तीचे काम सुरू होते. शुक्र वारी वसाहतीत कमी दाबाचा पाणीपुरवठा करण्यात येईल. याबाबत आम्ही दवंडी दिली आहे.- चंद्रहार सोनकुसरे,सहायक कार्यकारी अभियंता,सिडको