शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर वारंवार खोदकाम

By admin | Updated: March 27, 2017 06:33 IST

खारघर शहरात तीन महिन्यांपासून विविध कारणांनी शहरातील रस्ते खोदले जात आहेत. वारंवार शहरातील विविध

पनवेल : खारघर शहरात तीन महिन्यांपासून विविध कारणांनी शहरातील रस्ते खोदले जात आहेत. वारंवार शहरातील विविध सेक्टरमध्ये खोदल्या जाणाऱ्या रस्त्यांमुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. या खोदकामाचा परिणाम वाहतुकीवरही होत असून, वाहतूक पोलीस देखील या कारभाराला कंटाळले आहेत. खारघर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात संबंधित कंपनीला पत्रही दिले आहे. खारघर शहरात १ ते २५ सेक्टरमध्ये महावितरणच्या वतीने सबस्टेशनासाठी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीच रिलायन्स फोरजीच्या विद्युतवाहिन्या टाकण्यासाठी शहरात अशाच प्रकारे रस्ते उखडण्यात आले होते. शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर असताना, रस्ते खोदल्याने चालकांना वाहने पार्क करताना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अनेक वेळा शहरात वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. संध्याकाळी, घाईत कामावरून परतणाऱ्यांना खोदलेल्या खड्डे दिसत नसल्याने पादचारी खड्ड्यात पडतात आणि दुखापत होत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. शुक्रवारी सेक्टर १८ येथील नीळकंठ स्वीट या मिठाईच्या दुकानापाशी खोदलेल्या खड्ड्यात एक महिला पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. खारघर शहर शिवसेनेचे युवा नेते मनीष पाटील यांनी यासंदर्भात सिडकोला लेखी पत्र दिले आहे. मात्र अद्याप पत्राची दखल घेतली गेलेली नाही. एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न परिसरातील रहिवाशांकडून विचारण्यात येत आहे. (वार्ताहर)