शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोली गावाकरिता स्वतंत्र भुयारी मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 02:21 IST

पनवेल-मुंब्रा महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलामुळे कळंबोली गावात जाण्याकरिता रस्ता राहणार नाही. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी आंदोलन करून

अरुणकुमार मेहत्रे  कळंबोली : पनवेल-मुंब्रा महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलामुळे कळंबोली गावात जाण्याकरिता रस्ता राहणार नाही. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी आंदोलन करून हे काम बंद पाडले होते. त्यांच्या मागणीनुसार रस्ते विकास महामंडळाने येथे भुयारी मार्गाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भविष्यात कळंबोली गावात जाण्यासाठी वळसा मारण्याची गरज पडणार नाही.पनवेल-मुंब्रा महामार्गावर कळंबोली अग्निशमन केंद्राजवळ स्टील मार्केटकडे जाण्यासाठी क्र ॉसिंग आहे.परंतु येथून जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असे. कारण दोनही बाजूने भरधाव वाहने येतात. येथे दररोज लहान-मोठे अपघात घडत असत. त्यामुळे येथे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग बांधावा, यासाठी पाठपुरावा सुरू होता. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली होती. अपघात आणि वाहतूककोंडीवर उपाय म्हणून रस्ते विकास महामंडळाने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कळंबोली स्टील मार्केटलगत ६१.३७ कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.कळंबोली गावातील काळभैरव मंदिरापासून ते पाण्याच्या टाकीच्या काही मीटर अगोदर हा पूल बांधण्यात येत आहे.पुलाची लांबी ११३0 मीटर असल्याने कळंबोली गावात जाणारा मार्ग बंद होणार आहे. त्यामुळे गावात राहणाऱ्यांना कळंबोली सर्कल किंवा वसाहतीतून जावे लागणार आहे. ही गैरसोय होवू नये म्हणून पर्यायी व्यवस्था करावी या मागणीकरिता शेकापचे नगरसेवक रवींद्र भगत आणि गोपाळ भगत यांनी रस्ते विकास महामंडळाविरोधात आंदोलन केले होते. त्याचबरोबर उड्डाणपुलाचे काम सुध्दा बंद केले होते. ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत काम करू न देण्याचा इशारा त्यांनी दिला होता. स्थानिकांच्या मागणीचा विचार करून याठिकाणी अंडरपास अर्थात भुयारी मार्ग बांधण्यास रस्ते विकास महामंडळाने तयारी दर्शविली आहे. तशा आशयाचा प्रस्तावही संमत करण्यात आला आहे.या कामासाठी अतिरिक्त तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम करणाºया कंपनीचे व्यवस्थापकप्रदीप दहातोंडे यांनी त्यास दुजोरा दिला आहे.