शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक, ४८ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 00:26 IST

एका व्यक्तीची तब्बल ४८ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोली परिसरात घडला आहे.

पनवेल : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देतो, असे सांगून एका व्यक्तीची तब्बल ४८ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोली परिसरात घडला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोल्हापूर येथील सुनील श्रीपाद सावंत यांचा मुलगा आदित्य याने २०१६ मध्ये एमबीबीएसची पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी चौकशी करीत असताना त्यांच्या एका डॉक्टर मित्राने अमेय कस्तुरे यांच्यामार्फत एमजीएम कामोठे येथे प्रवेश मिळाला असल्याची माहिती दिली. त्यामुळे सावंत यांनी आदित्यच्या प्रवेशासाठी कस्तुरे यांच्याशी संपर्क साधला. २०१९-२० साठी मॅनेजमेंट कोट्यातून एमडीसाठी प्रवेश देतो, असे सांगून एक कोटी रुपयांची मागणी केली. त्यानुसार त्यांनी पाच लाख रुपयांचे टोकन दिले. त्यानंतर पहिल्या वर्षाची फी आणि डोनेशन म्हणून २५ लाख ५० हजार रुपये कस्तुरे यांच्याकडे देण्यात आले. २०१९ पर्यंत सावंत यांनी तब्बल ४८ लाख १९ हजार रुपये आरटीजीएस, एनईएफटी व रोख रकमेच्या स्वरूपात कस्तुरे यांना दिले. मात्र, मुलाचा प्रवेश झालाच नाही. कस्तुरेकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत काम लवकर होईल, असे सांगितले. मात्र, प्रवेश न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सावंत यांनी अमेय कस्तुरे याच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.>तारीख उलटूनही प्रवेश नाही२०१९ पर्यंत सावंत यांनी तब्बल ४८ लाख १९ हजार रुपये आरटीजीएस, एनईएफटी व रोख रकमेच्या स्वरूपात कस्तुरे यांना दिले. मात्र, मुलाचा प्रवेश झालाच नाही. अंतिम तारीख उलटून गेली तरी प्रवेश न झाल्याने सावंत यांना संशय आला.