शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
4
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
5
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
6
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
7
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
8
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
9
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
10
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
11
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
12
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
13
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
14
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
15
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
16
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
17
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
18
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
19
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
20
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच

गोठीवलीत विजेचा धक्का लागून चार मुले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 04:59 IST

उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीचा शॉक लागून एका लहान मुलासह तीन मुली जखमी झाल्या.

नवी मुंबई : उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीचा शॉक लागून एका लहान मुलासह तीन मुली जखमी झाल्या. घणसोलीजवळील गोठीवली येथील सेक्टर २३ मध्ये ही दुर्घटना घडली. जखमी झालेल्या चार मुलांना उपचारासाठी ऐरोली येथील बर्न सेंटर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.हेमांग चंद्रकांत (८), परी बिपीन सिंग (७), सोमन्या पाटील (८) व तनिशा चव्हाण (८), अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्या लहान मुलांची नावे आहेत. ही मुले आपल्या कुटुंबीयांसह गोठीवलीतील माउली हाइट्स या १५ मजली इमारतीत राहतात. या इमारतीच्या अगदी जवळून महावितरणची उच्चदाबाची विद्युतवाहिनी गेली आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी सोसायटीतील रहिवाशांकडून मागील वर्षभरापासून महावितरणकडे पाठपुरावा सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या एका मजल्यावर ही मुले खेळत होती. त्या वेळी शेजारून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युतवाहिन्यांना या मुलांचा स्पर्श झाला.विजेचा जोरदार झटका बसल्याने एका मुलीसह तीन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. भाजल्यामुळे लहान मुलांचे चेहरे जळाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या दुर्घटनेमुळे या सोसायटीतील रहिवाशांनी संताप व्यक्त केला असून, बुधवारी या प्रकरणी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रहिवाशांनी सांगितले.