शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसमारंभात जुन्या प्रथांचा विसर

By admin | Updated: April 5, 2016 01:30 IST

सध्या पैशांचा ओघ वाढल्याने सर्वत्र हायफाय लग्न संस्कृती रु जत आहे. त्यातच जुन्या प्रथा कालबाह्य होत चालल्या आहेत. पूर्वी लग्न म्हटले की, तीन दिवस घोळ असायचा

कांता हाबळे,  नेरळसध्या पैशांचा ओघ वाढल्याने सर्वत्र हायफाय लग्न संस्कृती रु जत आहे. त्यातच जुन्या प्रथा कालबाह्य होत चालल्या आहेत. पूर्वी लग्न म्हटले की, तीन दिवस घोळ असायचा, परंतु आता एका दिवसातच लग्न उरकण्याची पद्धत सुरू झाली आहे. यात गाणी म्हणणे, उखाणे घेणे, मुंडावळ्या बांधणे, कान पिळणे, कोपर मारणे अशा अनेक प्रथा बंद होत आहेत. एकीकडे लग्नसमारंभात पैशांचा चुराडा करत दिखाऊपणाचे स्वरूप आणले जात असताना दुसरीकडे लग्नसंस्कृतीचे वेगळेपण सांगणाऱ्या रीतिरिवाजांचा मात्र विसर पडत आहे. यामुळे जुन्या प्रथा, परंपरा बंद पडतील, अशी भीती ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.लग्न म्हणजे दोन जीवांना व त्यांच्या कुटुंबांना एकत्र आणण्याचा सोहळा. तो साधेपणाने व जुन्या प्रथा जपत समाजासमोर आदर्श निर्माण करता येतो. आता मात्र लग्नात पैशांचा चुराडा किती, यावर लग्नाचे मोठेपण अवलंबून आहे. पूर्वी मेहंदीच्या झाडाला मोहोर लागला की तो काढून ठेवला जायचा. नवरीची दृष्ट काढताना त्याचा वापर केला जायचा. नव्या पिढीला याबाबत काहीच माहिती नाही. पूर्वी हस्तकलेने साकारलेली वाकळ देण्याची प्रथा होती, ज्याला रुखवत म्हणतात. आज हे रुखवत लग्न समारंभातून बाद होत असून बाजारातील तयार वस्तू ठेवल्या जात आहेत. गाणी बोलणे, उखाणे घेणे, मुंडावळ्या बांधणे, कान पिळणे अशा अनेक प्रथांचा विसर पडला आहे. या कार्यक्रमांमुळे उपस्थित लोकांची चांगलीच करमणूक व्हायची.उखाणा घेणे परंपरा ही अनिवार्य होती. उखाणा घेतल्याशिवाय वधू-वराच्या भोवती जमलेले लोक हलत नसे. काही वर्षांपूर्वी वधू -वरांना बोहल्यावर चढण्याआधीच दोन-चार उखाणे तोंडपाठ करून ठेवावे लागत. काही उखाणे शब्द सौंदर्याने परिपूर्ण आशयघन असत. आता तर उखाणे ऐकायला मिळत नाहीत. त्यामुळे उखाण्यांची परंपरा अडगळीत जात आहे. हल्ली लग्न समारंभात वधू-वरास भेटवस्तू म्हणून बंद पाकिटे व निसर्गचित्राची फ्रेम दिली जातात. पूर्वी हा प्रकार नव्हता. त्याकाळी सोने-चांदी स्वस्त असल्याने जोडवी, पैंजण, अंगठी, चांदीचा पट्टा अशा भेटवस्तू देत. पूर्वी लग्न म्हणजे गावातील उत्सव असायचा व प्रत्येक नागरिक यात सहभागी होत. आजचा लग्न समारंभ हा धार्मिक विधीचे गांभीर्य जपण्यापेक्षा दिखाऊपणाला अधिक महत्त्व देणारा ठरत आहे. या सगळ्या धामधुमीत जुने रीतिरिवाज प्रत्येक घरात जपणे आवश्यक आहेत.