शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये पुन्हा कचरा वर्गीकरणाची सक्ती; महानगरपालिकेची सोसायट्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 23:41 IST

ओला, सुका कचरा वेगळा करण्यासाठी आठवण

पनवेल : पनवेल महापालिकेकडून रहिवासी सोसायट्यांना नोटीस देऊन कचरा वर्गीकरण करण्याची पुन्हा सक्ती केली आहे. कोरोना काळात या वर्गीकरणाला खंड पडल्याने नागरिकांना कचरा वर्गीकरणासंदर्भात आठवण करून देण्यासाठी या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.ओला आणि सुका कचरा वेगळा केला नाही, तर सोसायटीतील कचरा ५ आॅक्टोबरपासून उचलला जाणार नाही, असा इशारा महापालिकेने दिला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात दररोज ४५० टन कचरा जमा केला जातो. महापालिका क्षेत्राच्या ११० चौरसमीटर क्षेत्रातील पूर्वीच्या सिडको वसाहतीतील कचरा व्यवस्थापनाचे हस्तांतरण सिडकोकडून महापालिकेने दीड ते दोन वर्षांपूर्वी घेतले आहे. महापालिकेने स्वत: घंटागाड्या खरेदी करून कचरा उचलून सिडकोच्या घोट गावाजवळ असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकला जातो.घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अंतर्गत कचरा निर्मात्यांनी वर्गीकरण करून ओला आणि सुका व घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण करणे अपेक्षित आहे. आता पनवेल महापालिकेने पुन्हा एकदा नव्याने कचरा वर्गीकरण करण्याची सक्ती केली आहे.कोरोनाच्या काळात नागरिकांनी कचरा वेगळा केला नाही, म्हणून पुन्हा नव्याने जनजागृती करण्यासाठी ही सक्ती केली जात असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हणणे आहे. जैविक विघटनशील कचरा म्हणजेच स्वयंपाक घरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी आठवड्यातून काही दिवस येईल आणि काही ठरावीक दिवस फक्त सुका कचरा गोळा केला जाईल, असे महापालिकेचे नियोजन असल्याची माहिती स्वच्छता विभागातून देण्यात आली. महापालिकेने घंटागाड्यांचेही या पद्धतीने नियोजन केले असल्याची माहिती सहायक आयुक्त धैर्यशील जाधव यांनी सांगितले.आरोग्य निरीक्षकांना त्यांच्या भागात सुका कचरा किती प्रमाणात जमा होतो, याचा अंदाज घेऊन संबंधित भागात गरजेनुसार आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फक्त सुका कचरा गोळा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.सॅनिटरी नॅपकिन व डायपरसाठी यंत्रणा लवकरचकचºयाचे वर्गीकरण करत असतात, सॅनिटरी नॅपकिन व डायपर आदींही कचºयात मोठ्या प्रमाणात समाविष्ट असतात. अशा प्रकारच्या कचºयाचे विघटन करण्यासंदर्भात पालिका स्वतंत्र यंत्रणा लवकरच उभारणार आहे.घनकचरा व्यवस्थापन नियमाप्रमाणे ओल्या कचºयाची विल्हेवाट सोसायटीत लावणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात या प्रक्रियेत खंड निर्माण झाला होता. नागरिकांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी नव्याने या संदर्भात नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी त्याचे पालन करावे.- धैर्यशील जाधव, सहायक आयुक्त, पनवेल महानगरपालिका