शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयीन कामासाठी पायपीट

By admin | Updated: February 15, 2017 04:57 IST

महापालिकेशी संबंधित कामासाठी सानपाडावासीयांना पायपीट करून तुर्भे विभाग कार्यालयात यावे लागते. त्यामुळे त्यांची मोठ्या

नवी मुंबई : महापालिकेशी संबंधित कामासाठी सानपाडावासीयांना पायपीट करून तुर्भे विभाग कार्यालयात यावे लागते. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सानपाडावासीयांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले असून सानपाडावासीयांची गैरसोय टाळण्यासाठी तुर्भे विभाग कार्यालयाचा सानपाड्यात विस्तार करण्याची मागणी केली आहे.गेल्या काही वर्षांत सानपाडा विभागाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. त्यामुळे येथील लोकसंख्याही वाढली आहे. नागरी प्रश्न निर्माण झाले आहेत. सानपाडा वसाहत महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाअंतर्गत येते. त्यामुळे कोणत्याही कामासाठी येथील रहिवाशांना तुर्भे गावापर्यंत पायपीट करावी लागते. यात श्रम व वेळ वाया जात असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. काही दिवसांपूर्वी ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत मंदा म्हात्रे यांनी सानपाडा तेथील रहिवाशांशी संवाद साधला होता. त्यावेळी रहिवाशांनी तेथील समस्यांचा पाढा वाचला होता. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन त्यांनी रहिवाशांना दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात रहिवाशांची पायपीट थांबविण्यासाठी तुर्भे विभाग कार्यालयाचा सानपाड्यात विस्तार करावा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच परिवहनची सेवा पूर्ववत सुरू करावी, उद्यानांचे सुशोभीकरण करावे, सानपाड्यात नागरी आरोग्य केंद्र सुरू करावे, सानपाडा रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गाची दुरुस्ती करावी आदी मागण्याही त्यांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी)