शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ठोक मानधनावरील शिक्षक ६ महिने राबले बिनपगारी

By admin | Updated: May 2, 2017 03:24 IST

महापालिकेने महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून मुख्यालयावर आकर्षक रोषणाई केली. देशातील आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका

नवी मुंबई : महापालिकेने महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून मुख्यालयावर आकर्षक रोषणाई केली. देशातील आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका म्हणून लौकिक मिरविला जात असताना दुसरीकडे पालिकेच्या शाळेतील शिक्षकांना सहा महिने बिनपगारी काम करावे लागत आहे. उपासमार होऊ लागलेल्या शिक्षकांनी नुकतीच आयुक्तांची भेट घेऊन वेतन मिळावे, अशी मागणी केली आहे. पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्व्ीाकारल्यापासून सर्व घटकांचे म्हणने ऐकून कामकाज करण्यास सुरुवात केली आहे. कडक शिस्तीचे असले तरी कोणावर विनाकारण अन्याय केला जात नाही. यामुळे शिक्षण मंडळात विनावेतन काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यामध्ये आम्ही ठोक मानधनावरील शिक्षक सहा वर्षांपासून महापालिकेच्या शाळांमध्ये ज्ञानदानाचे काम करत आहोत. काही महिन्यांपूर्वी आमच्या पुन:नियुक्तीची शक्यता खूप कमी असल्यामुळे आम्ही नोकरी वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली व न्याय मागितला; परंतु महापालिकेच्या वतीने थोड्याच दिवसांमध्ये शिक्षक समायोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे ठोक मानधनावरील शिक्षकांना कामावर घेऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. आम्ही त्यांची अट मान्य करून उच्च न्यायालयाच्या अधिन राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी समायोजित शिक्षक येईपर्यंत विनावेतन काम करण्याची तयारी दर्शविली होती; पण प्रत्यक्षात महापालिकेकडे समायोजित शिक्षक आले नाहीत व यासाठी आता सहा महिन्यांचा कालावधी गेला आहे. वेतन मिळविण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने वेतन देण्याचा अधिकार नवी मुंबई महापालिकेचा आहे. शिक्षणाधिकारी जो निर्णय घेतील त्यास कोणतीही हरकत नसेल, असे मत नोंदविले आहे. आयुक्तांनी निवेदन स्वीकारले असून यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उपासमार कधीपर्यंतमहापालिका शाळेमध्ये सहा वर्षे शिक्षक ठोक मानधनावर कार्यरत आहेत. सहा महिन्यांपासून विनावेतन काम करत आहेत. पगारच नसल्याने उपासमार होत असून शिक्षकांविषयी सहानुभूतीने निर्णय घेण्यात यावा व आम्हाला योग्य न्याय मिळावा. - सिद्धराम शिलवंत