शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

By admin | Updated: April 28, 2017 00:39 IST

महापालिकेच्या पहिल्या सार्र्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निवडणुका पूर्णपणे पारदर्शी व निर्भय

पनवेल : महापालिकेच्या पहिल्या सार्र्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निवडणुका पूर्णपणे पारदर्शी व निर्भय वातावरणामध्ये पार पाडल्या जातील. निवडणुकीदरम्यान सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केले आहे. निवडणुकीविषयी माहिती देण्यासाठी आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माहिती देताना निंबाळकर यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी सुरू आहे. मतदानासाठी ६ विभागीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीन पारदर्शकच असून तीन टप्प्यात उमेदवारांना त्याची खात्री करता येते असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. महापालिकेत निवडणुकीसाठी एक खिडकी तयार केली असून स्वतंत्र माहिती कक्षसुद्धा कार्यरत आहे, असेही यावेळी सांगण्यात आले आहे. पूर्वपरवानगीशिवाय प्रचार करणे, आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे, पेड न्यूज देणे, मतदारांना आमिषे दाखवणे, खर्चाच्या मर्यादा ओलांडणे याबाबत कुठलाही मुलाहिजा न ठेवता कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. पोलीस यंत्रणा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक हेसुद्धा सज्ज असतील, असेही यावेळी जाहीर केले आहे. जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करा, असे आवाहन आयुक्तांनी शेवटी केले.