शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

वाहतूककोंडीवर शहर गतिशीलता योजना, उड्डाणपुलांचे जाळे उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 04:30 IST

शहरात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी महापालिकेने शहर गतिशीलता योजनेची (शहर मोबॅलिटी प्लॅन) घोषणा केली आहे. तुर्भे नाका, नेरुळ रेल्वेस्थानक, पामबीच रोडवर ऐरोली ते घणसोली दरम्यान उड्डाणपुलासह अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा महापौर जयवंत सुतार यांनी केली आहे.

नवी मुंबई : शहरात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी महापालिकेने शहर गतिशीलता योजनेची (शहर मोबॅलिटी प्लॅन) घोषणा केली आहे. तुर्भे नाका, नेरुळ रेल्वेस्थानक, पामबीच रोडवर ऐरोली ते घणसोली दरम्यान उड्डाणपुलासह अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा महापौर जयवंत सुतार यांनी केली आहे. ऐरोली, वाशी ते उलवे दरम्यान सागरी मार्ग बनविण्याच्या योजनेचाही यामध्ये समावेश आहे.नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भविष्यात सुरू करण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती देण्यासाठी महापौर जयवंत सुतार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. भविष्यात शहर मोबॅलीटी प्लॅनच्या अंतर्गत वाशी सेक्टर १७ ते सानपाडा वारणा चौकपर्यंत सर्व्हिस रोड बनविण्यात येणार आहे. पामबीच रस्त्यावर सर्व्हिस रस्ता बनविणे. वाशी सेक्टर १७ मधून पामबीचवरून पुण्याकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका बांधण्यात येणार आहे. ऐरोली नाका येथे भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. कोपरखैरणे विभागातील पावणे ब्रिज ते सेक्टर ११ दरम्यान नवीन पूल बांधण्यात येणार आहे. यामुळे तुर्भे एपीएमसी व सानपाड येथून कोपरखैरणे व ठाणे-बेलापूर रोडकडे जाणाºया नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. नाल्यावर ४० मीटर लांबीचा व १२ मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार आहे. ठाणे-बेलापूर रोडवरून कोपरखैरणे-घणसोली पामबीचकडे जाण्यासाठी नवीन लिंक रोड महापेला जोडण्यात येणार आहे.ठाणे-बेलापूर रोडवरून ऐरोली गाव, समतानगर, साईनाथवाडी, शिवकॉलनी येथे जाण्यासाठी सेक्टर ३ भारत बिजलीच्या भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. तेथील समस्या सोडविण्यासाठी ऐरोली नाका परिसरात नवीन भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. कोपरखैरणे डी-मार्ट जवळ रस्ता ओलांडताना नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. वाहतूककोंडी वाढत असून, भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरामध्ये नवीन पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. नेरुळ सेक्टर २१मधील रेल्वेस्थानकासमोरील नरेश चौकातून पादचारी भुयारी मार्ग बांधणार आहे. ऐरोली ते कटई नाका येथे एमएमआरडीए बांधत असलेला पूल ठाणे-बेलापूर रोडला जोडणार आहे. बेलापूर गावातून रेल्वेलाइन पुलाखालून आम्रमार्गाला समांतर महापालिका मुख्यालयापासून नवीन रस्ता बांधणे. बेलापूर आयकर कॉलनी ते बेलापूर स्मशानभूमी येथे रस्ता बनविणार आहे. बेलापूर विभागातील आम्रमार्ग ते सेक्टर ११, दिवाळे गाव मार्गे सायन-पनवेल महामार्गाला जोडणारा नवीन मार्ग बनविण्यात येणार आहे.तुर्भे नाक्यावर नवीन उड्डाणपूलपालिकेने ठाणे-बेलापूर रोडचे काँक्रीटीकरण केले आहे. एमएमआरडीएने या रोडवर दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्ग तयार केल्यानंतरही तुर्भे नाका येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. कोंडी सोडविण्यासाठी तुर्भे नाका येथे ६५४ मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.ऐरोली ते उलवे सागरी मार्गमहानगरपालिकेला दिवा ते दिवाळे दरम्यान विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. खाडीकिनाºयापासून जवळच आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. या परिसरातील वाहतूक जलद व सुरळीत व्हावी यासाठी ऐरोली ते वाशी व वाशी ते उलवे दरम्यान सागरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे.नेरूळमध्ये उड्डाणपूलरेल्वे स्टेशनच्या पूर्व व पश्चिमेला जाण्यासाठी सीवूड किंवा राजीव गांधी उड्डाणपुलाचा वापर करावा लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी आयुक्त बंगला ते रेल्वे स्टेशनदरम्यान नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे.पामबीचवर नवीन पूलपामबीच रोडवर घणसोली ते ऐरोलीदरम्यान १.९५ किलोमीटर लांबीचा नवीन पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी एमसीझेडएकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरीनंतर या पुलाचे काम सुरू केले जाणार आहे.जुईनगर रेल्वे क्रॉसिंग ब्रीजरेल्वे रूळांमुळे जुईनगरमध्ये जाणाºया नागरिकांना नेरूळ किंवा सानपाडामधून जावे लागत आहे. येथील नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी जुईनगर येथे नवीन रेल्वे क्रॉसिंग पूल बांधण्यात येणार आहे.तुर्भे पुलावरून नवीन मार्गिकावाशीकडून तुर्भे पुलावरून एमआयडीसी क्षेत्रात फायझर मार्गे जायचे झाल्यास तुर्भे नाका येथे ठाणे- बेलापूर रोडला छेदून जावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी तुर्भे पुलाला फायझर कंपनीकडील रस्त्याला जोडण्यासाठी उन्नत मार्गिका बांधण्यात येणार आहे.नवी मुंबई महापालिकेने एमआयडीसीसह सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले आहे. भविष्यात होणारी संभाव्य वाहतूककोंडी लक्षात घेवून शहर मोबॅलिटी प्लॅन तयार केला आहे. यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग व सागरी मार्ग बनविण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने हे प्रकल्प पूर्ण केले जातील.- जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई