शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूर जंक्शनजवळील उड्डाणपूल झाला खुला, वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 00:31 IST

Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका मुख्यालयाजवळील बेलापूर जंक्शन येथे पामबीच मार्ग, जेएनपीटी उरण रोड, सायन पनवेल महामार्ग, सीबीडीकडे जाणारा रस्ता अशा विविध रस्त्यांचा चौक आहे.

 नवी मुंबई : सीबीडी बेलापूर येथील महापालिका मुख्यालयाशेजारील बेलापूर जंक्शन येथे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, वाहतुकीसाठी उड्डाणपूल खुला करण्यात आला आहे.नवी मुंबई महापालिका मुख्यालयाजवळील बेलापूर जंक्शन येथे पामबीच मार्ग, जेएनपीटी उरण रोड, सायन पनवेल महामार्ग, सीबीडीकडे जाणारा रस्ता अशा विविध रस्त्यांचा चौक आहे. या ठिकाणी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होत होती. या मार्गावरून उरणच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित केले जात असून, भविष्यात वाहतूककोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने या मार्गावर बेलापूर जंक्शन येथे उड्डाणपूल विकसित केला जात आहे. या उड्डाणपुलाचे सायन पनवेल महामार्गाकडून उरणच्या दिशेने जाणाऱ्या एका टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, उरण कडून सायन-पनवेल महामार्गाकडे येणाऱ्या एका टप्प्याचे काम सुरू आहे.

एका टप्याचा वापर सुरूसद्यस्थितीत होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी उड्डाणपुलाच्या पूर्ण झालेल्या एका टप्प्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. या पुलावरून जड-अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने जंक्शनवर होणारी वाहतूककोंडी काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे. वाहतूककोंडीची समस्या सुटल्याने वाहनचालक समाधान व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई