शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

मुलुंड-ऐरोलीला जोडणार उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 02:32 IST

घणसोली-ऐरोली जोडरस्त्यावर ३७२ कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्याच्या जोडरस्त्याची लांबी ३.४ कि.मी. असेल तर जोड उड्डाणपुलाची लांबी १.०६ कि.मी. असणार आहे.

नवी मुंबई : घणसोली-ऐरोली जोडरस्त्यावर ३७२ कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्याच्या जोडरस्त्याची लांबी ३.४ कि.मी. असेल तर जोड उड्डाणपुलाची लांबी १.०६ कि.मी. असणार आहे. हा उड्डाणपूल ऐरोली-मुलुंड, काटईला जोडला जाणार असल्यामुळे नवी मुंबईची वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. खासदार राजन विचारे यांच्या घणसोली येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचा पाहणी दौरा गुरुवारी केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, सिडको, वनविभाग, महापालिकेचे संबंधित अधिकारी, शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, विजय चौगुले आदी यावेळी उपस्थित होते. या जोडरस्ता उड्डाणपुलामुळे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, मुरबाडकडे जाण्यासाठी प्रवाशांना कमी वेळेत सुरक्षित  प्रवासाची सोय होणार आहे. त्याचबरोबर घणसोली, कोपरखैरणे, दिवा आणि वाशी परिसरातील प्रवाशांना या उड्डाणपुलाचा फायदा होणार आहे. गेल्या १२ वर्षांपासून रखडलेल्या या जोडरस्त्यावरील उड्डाणपूल प्रकल्पाला गती यावी यासाठी २४ डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे  यांच्या उपस्थितीत त्यांनी सर्वप्रथम हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला.  आयुक्त अभिजीत बांगर यांनी  पदभार स्वीकारताच हाच ८०० कोटींचा प्रकल्प आता ३७२ कोटींवर आणून सिडको आणि महापालिकेचे ४२८ कोटी रुपये वाचविले.  याबद्दल विचारे यांनी आयुक्तांना धन्यवाद दिले.  

१५ दिवसांनी  काम सुरूठाणे-बेलापूर मार्गावरील रस्त्याला पर्याय रस्ता म्हणून ऐरोली-ठाणेकडे जाण्यासाठी वाशी-अरेंजा कॉर्नरपासून एकूण आठ ठिकाणांच्या वाहतूक सिग्नल जंक्शन ओलांडून जावे लागते. त्यामुळे वाशी सेक्टर १७ ते महात्मा फुले जंक्शन ते कोपरखैरणे अशा उड्डाणपुलाच्या कामासाठी खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNavi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई