शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१२ फूट खोल पाण्यात ध्वजारोहण, संचलन; नौदलातील ११ सेवानिवृत्त कंमोडोंची मानवंदना, जगातील पहिलाच प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2022 19:49 IST

सेवानिवृत्त कमांडो रवींद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा अनोखा सांघिक ध्वजारोहण कार्यक्रम पाहण्यासाठी स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनी विमला तलाव परिसरात गर्दी केली होती.

मधुकर ठाकूर -

उरण : नौदरातील अकरा सेवानिवृत्त कंमोडोंची चार आठवड्यांची मेहनत आणि सरावानंतर, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून उरणच्या ऐतिहासिक विमला तलावात १२ फूट खोल पाण्यात ध्वजारोहण, संचलन व शहीदांना सलामी देण्यात आली. हा कार्यक्रम रविवारी रात्री पार पडला. हा भारतीलच नव्हे तर जगातील पहिलाच प्रयोग मानला जात आहे.

सेवानिवृत्त कमांडो रवींद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा अनोखा सांघिक ध्वजारोहण कार्यक्रम पाहण्यासाठी स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनी विमला तलाव परिसरात गर्दी केली होती. नौदलाचे सेवानिवृत्त कमांडो रवींद्र कुलकर्णी यांना दोन महिन्यांपूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काही तरी नवीन, अनोखे करण्याची कल्पना सुचली. यापूर्वी त्यांनी पाण्याखाली लग्न सोहळा करण्याची कल्पना प्रत्यक्षात यशस्वीरीत्या उतरवली होती. त्याचा अनुभव गाठीशी असल्याने कुलकर्णी यांनी कधीही, कुठेही आणि कुणीही न केलेला १२ फुटी खोल पाण्याखाली ध्वजारोहण संचलन व शहिदांना वंदन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपल्या नौदलाच्या सेवानिवृत्त झालेल्या अन्य दहा कमांडोजशी चर्चा केली आणि त्यांच्या होकारानंतर उरणमधील ऐतिहासिक विमला तलावात १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला रात्री १०. ३० वाजता ध्वजारोहण संचलन व शहीद वंदनेचा हा सोहळा पार पाडण्याची तयारी सुरू केली.

 यासाठी विमला तलावात १२ फूट खोल स्विमिंग पूलमध्ये डायविंग उपकरणासहित सुसज्ज असलेल्या भारतीय मरीनच्या माजी कमांडोच्या टीमचा महिन्या भरापासून सराव सुरू होता. महिनाभराच्या सरावानंतर उरणच्या विमला तलावात ध्वजारोहण संचलन व शहीद वंदनेचा अनोखा सोहळा दिमाखात पार पडला.

हे करीत असताना राष्ट्रगीताचे मंजूळ स्वर तलावातून तलावाबाहेर सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी हजेरी लावलेल्या शेकडो स्वातंत्र्य प्रेमींच्या कानी पडले आणि त्यांनी भारतमातेचा जयघोष केला. राष्ट्रभक्ती दर्शविणारा हा सोहळा उरणकरांसह देशासाठीही अभिमानास्पद ठरला असल्याच्या भावना सेवानिवृत्त कमांडो रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.  फक्त ३२ मिनिटांत ध्वजारोहण संचलन व शहीद वंदनेचा अनोखा सोहळा पार पडला. याआधी काही देशांत फक्त दोघांनी पाण्यात उतरून ध्वज पकडण्याचा सोहळा केला आहे. मात्र नौदलाच्या सेवानिवृत्त ११ कमांडोजनी १२ फुटी पाण्याखाली झेंडावंदन, ध्वजसंचलन, राष्ट्रगीत, परेड भारतातच नव्हे, तर जगातील एकमेव घटना असल्याचा दावा सेवानिवृत्त कमांडो रवींद्र कुलकर्णी यांनी माहिती देताना केला आहे. यावेळी, रवींद्र कुलकर्णी, नंदलाल यादव, रामदास कळसे, सज्जन सिंग, भुपेंद सिंग, ब्रीजभुषण शर्मा, रामेश्वर यादव, विनोद कुमार, महेंद्र सिंग, अनिल घाडगे आणि एल.सी.जगजीवन हे नौदलाचे सेवानिवृत्त कमांडो

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNavi Mumbaiनवी मुंबई