शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तांच्या हस्ते कोकण भवन येथे ध्वजारोहण

By कमलाकर कांबळे | Updated: August 15, 2023 12:15 IST

कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत  इमारतीच्या आवारात भव्य दिव्य असा मंच उभारून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

कमलाकर कांबळे /नवी मुंबई

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: स्वातंत्र्य  दिनाचा वर्धापन दिन  कोकणभवन येथे जल्लोषात साजरा झाला. यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते कोकण भवनच्या प्रांगणात सकाळी  ध्वजारोहण करण्यात आले. 

 कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत  इमारतीच्या आवारात भव्य दिव्य असा मंच उभारून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.  इमारतीच्या आवारात नवनवीन संकल्पनेतून आकर्षक असे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा संदेश देणारी रांगोळी, सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. 

    यावेळी नवी मुंबई पोलीस पथक यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमास बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र प्रविण पवार, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, नगरपरिषद संचालकक तथा आयुक्त मनोज रानडे, अप्पर आयुक्त कोकण विभाग किशन जावळे, उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (सामान्य) अजित साखरे, उपायुक्त (पुनर्वसन) रिता मैत्रेवार, उपायुक्त (पुरवठा) रवि पाटील, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, उपायुक्त (विकास आस्थापना) मिनल कुटे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे, डॉ.प्रकाशराव शेंडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ  तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. 

    कोकण विभागात यशस्वीरित्या पार पडलेल्या महसूल सप्ताह दरम्यान झालेल्या विविध कामांचा आढावा घेणारी “महसूल सप्ताह इंद्रधनुष्य पुस्तिका-2023”चे विभागीय महसूल आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच कोकण विभागातील आपत्ती व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या वॉररुमचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. तर नोंदणी  शाखेचे उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोकण भवन इमारतीच्या चौथ्या  मजल्यावरील महसूल विभागाच्या पुरवठा शाखेचे उद्घाटन विभागीय महसूल आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले.    यावेळी विभागीय महसूल आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना भारतीय स्वातंत्र्याच्या  वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबाजी गीते यांनी केले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन