वैभव गायकर,पनवेल: मुसळधार पावसात खारघर सेक्टर 6 जवळील डोंगरावरील धबधब्यजवळ पर्यटनासाठी आलेले 5 पर्यटक मुसळधार पावसामुळे अडकले होते. साधारणतः ग्राउंड लेव्हलपासून 600 ते 700 मीटर आत मध्ये धबधबा च्या खाली हे पाच पर्यटक अडकले होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना खाली येता येत नव्हते. यावेळी खारघर पोलीस घटनास्थळी दाखल होत या पर्यटकांची सुटका केली.
पाचही जण मुंबई मधील सायन कोळीवाडा येथील रहिवासी आहेत.महेश सुभाष शिरगड(22),राकेश वेलमुर्गन(18),प्रतिक जोग वय(18),रमेश चिंगमेटे (19), साहील शेख(21) अशी या पर्यटकांची नावे आहेत.अग्निशमन कर्मचारी आणि खारघर पोलिसांनी या पर्यटकांची सुखरूप सुटका केली.पांडवकडा परिसरात पर्यटकांना बंदी असताना खारघर मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक नियम डावलून पर्यटनासाठी येत असतात.