शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल परिसरात डेंग्यूचे २२ संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 02:02 IST

स्वाइन फ्ल्यूचा रुग्ण दगावला : साथीचे आजार बळावण्याची शक्यता

वैभव गायकर

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात साथीच्या आजारांचा धोका बळावला आहे. कामोठे सेक्टर १७ मधील रहिवासी नाना सहाणे यांचा स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याने पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात डेंग्यू, मलेरिया सोबत स्वाइन फ्ल्यूचा धोका निर्माण झाला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पनवेल महापालिका क्षेत्रात २२ डेंग्यू तर नऊ मलेरियाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. मात्र, महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयांत दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येनुसार हा आकडा १०० पेक्षा जास्त आहे. मागील चार दिवसांपासून मुसळधार पावसाने पनवेलमध्ये जोरदार हजेरी लावली. पावसाने उसंत घेतल्यानंतर साथीचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी गाढी नदीला आलेल्या पुरामुळे पनवेल शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. विशेषत: गाढी नदीकिनाऱ्यावरील लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला होता. त्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता असल्याने महापालिकेने या ठिकाणी त्वरित धुरीकरण व फवारणी करणे गरजेचे आहे.सध्याच्या घडीला पनवेल शहरात सर्वात जास्त डेंग्यूचे संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यानंतर कळंबोली, खारघर, नवीन पनवेल या ठिकाणीदेखील डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या मोठी आहे. या व्यतिरिक्त ग्रामीण भागात साथीचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डेंग्यू विषाणूजन्य आजार आहे. एडीस इजिप्ती डासाच्या चावण्याने हा आजार होतो. आजारावर वेळीस उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. मात्र, दुर्लक्ष केल्यास प्राणही गमवावा लागू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. सध्या अनेक भागांत दूषित, गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पोटांच्या आजारांचे विकारदेखील वाढत आहेत. गॅस्ट्रो, कॉलरा व कावीळ या रुग्णांची संख्याही वाढत आहे.

स्वाइन फ्ल्यूने दगावलेल्या रुग्णाबाबत आरोग्य विभाग अनभिज्ञ

साथीच्या आजारांबरोबर स्वाइन फ्ल्यूचा धोकादेखील शहरात बळावला आहे. रुग्णाच्या नाकातील व घशातील स्राव, घाम, थुंकीमधून स्वाइन फ्ल्यूच्या विषाणूंचा प्रसार होतो. स्वाइन फ्ल्यूचे विषाणू हे हवेत साधारणत: आठ तास जिवंत असतात. सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रात एकूण सहा नागरी आरोग्य केंद्र आहेत. खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे या ठिकाणी प्रत्येक एक व पनवेल शहरात दोन नागरी आरोग्य केंद्राचा समावेश आहे. या केंद्रात रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातात. तर एक ग्रामीण रुग्णालय आहे. शहराच्या तुलनेत अद्ययावत सरकारी आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. महापालिकेकडून दरवर्षी साथीचे आजार निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली जाते. मात्र, प्रत्याक्षात धुरीकरण व फवारणी वेळेवर होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.स्वाइन फ्ल्यूचे कामोठे शहरात दोन रुग्ण असल्याची माहिती नगरसेवक डॉ. अरुण भगत यांनी १६ जुलै रोजी पालिकेला लिहिलेल्या पत्रात दिली होती. यापैकी नाना बजाबा सहाणे यांचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आणखी एक रुग्ण परशुराम कानू गायकवाड यांच्यावर खांदा वसाहतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. भगत यांनी पालिकेला दिली असूनही पत्राची दखल घेतली गेली नाही. कामोठे शहरात स्वाइन फ्ल्यूने रुग्ण दगावल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रज्ञा नरावडे यांच्याकडे उपलब्ध नाही.साथीचे आजाराची लागण टाळण्यासाठी नागरिकांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. उकळलेले पाणी प्यावे, तसेच गर्दीच्या ठिकाणी जावे टाळावे. घराजवळ पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी प्राथमिक उपचारासाठी पालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.- डॉ. प्रज्ञा नरावडे,वैद्यकीय अधिकारी,पनवेल महापालिका 

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबई