शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये पाच उमेदवार अशिक्षित

By admin | Updated: February 16, 2017 02:11 IST

रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांपैकी

मयूर तांबडे / पनवेलरायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांपैकी पाच उमेदवार अशिक्षित आहेत, तर सात पदवीधर उमेदवार असून एक पीएचडीधारक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. काही गणांमध्ये राजकीय पक्षांना उमेदवारच मिळत नसल्याने अशिक्षितांना उमेदवारी दिली असल्याचे बोलले जात आहे.आठ जागांसाठी शेकापने जिल्हा परिषदेसाठी आठ, भाजपा सहा, काँग्रेस ०, शिवसेना पाच, बसपा एक, भारिप एक, अपक्ष दोन असे २३ उमेदवार आहेत. तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी शेकाप १२, भाजपा १४, काँग्रेस चार, शिवसेना सात, अपक्ष दोन असे ३९ उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपा, शेकाप, काँग्रेस, शिवसेनेचा एकही पदवीधर उमेदवार उभा केलेला नाही. २३ पैकी विविध पक्षांच्या २२ उमेदवारांनी पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतले असल्याचे प्रतिज्ञापत्रासोबत लिहिले आहे. जिल्हा परिषदेचे भरत देशमुख हे उमेदवार वकील आहेत. ते गव्हाण गणातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.पं.स.साठी भाजपातर्फे पाली देवंद गणातून अमोल इंगोले, आपटा गणातून तनुजा संजय टेंबे, पळस्पे गणातून सुनील राजाराम गवंडी, वडघर गणातून रेखा म्हात्रे, नेरे गणातून राज पाटील, तर शेकापकडून आपटा गणातून नेहा महाडिक, गुळसुंदे गणातून जगदीश पवार हे उमेदवार पदवीधर आहेत. अविनाश गाताडे यांनी पीएचडी केलेली आहे. पंचायत समिती सावळे गणातून भाजपातर्फे ते निवडणूक लढवत आहेत. वडघर गटातील शिवसेनेच्या पदीबाई ठाकरे, पंचायत स्ािमतीसाठी वहाळ गणात भाजपाच्या देवकी कातकरी, काँग्रेसच्या यमुना कातकरी, शिवसेनेच्या सुरेखा वाघमारे, करंजाडे गणात शिवसेनेच्या द्रौपदी कातकरी हे पाचही उमेदवार शाळेतच गेल्या नसल्याचे प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे.