शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मासळी उद्योगाला हवी आधुनिक जोड

By admin | Updated: November 8, 2016 02:45 IST

भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण संस्थेकडे मासेमारी व्यवसायासाठी लागणारी सर्वच माहिती उपलब्ध आहे.

उरण : भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण संस्थेकडे मासेमारी व्यवसायासाठी लागणारी सर्वच माहिती उपलब्ध आहे. सागरी जीवजंतू आणि जीवसृष्टीची हानी होणार नाही याची दक्षता मासळी व्यावसायिकांनी संस्थेशी संपर्क साधून माहिती उपलब्ध करून घ्यावी. तसेच संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मासळी व्यवसायाला अत्याधुनिकतेची जोड देवून व्यवसाय फायदेशीर आणि अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचा मच्छीमार व्यावसायिकांनी प्रयत्न करावा. यासाठी सर्वतोपरी तांत्रिक सहकार्य करण्याचे आश्वासन भारतीय मत्सिकी सर्वेक्षण मुंबई तळाचे क्षेत्रीय निर्देशक डॉ. एल. रामलिंगम यांनी करंजा उरण येथे आयोजित कार्यक्रमातून केले. भारतीय मत्सिकी सर्वेक्षण मुंबई तळा, भारत सरकार कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, पशुपालन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग, करंजा मच्छीमार संस्थेचे सदस्य गणेश नाखवा यांच्या प्रयत्नातून मच्छीमारांसाठी शनिवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय मत्सिकी सर्वेक्षण मुंबई तळाचे क्षेत्रिय निर्देशक डॉ. एल रामलिंगम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष शिवदास नाखवा यांच्या अध्यक्षतेखाली करंजा-उरण येथील चाणजे ग्रा. पं. च्या मोकळ्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी भारतीय मत्सिकी सर्वेक्षण मुंबई संस्थेचे वैज्ञानिक डॉ. एस. के. द्विवेदी, वैज्ञानिक अशोक कदम, मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य अलिबाग रायगड विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश नाखवा,प्रगती मच्छीमार सह. संस्थेचे अध्यक्ष के. एल. कोळी, करंजा मच्छीमार संस्थेचे माजी अध्यक्ष नारायण नाखवा आणि मच्छीमार यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेचे उद्घाटन करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष शिवदास नाखवा यांच्या हस्ते झाले. भारतीय मत्सिकी सर्वेक्षण संस्थेकडे मासेमारी व्यवसायासाठी लागणारी सर्वच माहिती उपलब्ध आहे. तसेच संस्थेकडे सर्वेक्षणासाठी अद्ययावत जहाजे आहेत. त्यामुळे मत्स्य साठे कोणत्या सागरी क्षेत्रातील कोणत्या जागेत आहेत हे शोधून काढण्याचे काम ही संस्था करीत आहे. मत्स्य साठ्याचे प्रमाण किती आहे याचीही पक्की माहितीही संस्थेकडे आहे. त्याशिवाय खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी मासेमारी कोणत्या क्षेत्रात आणि कशी करावी याची माहितीही करून दिली जाते. संस्थेकडे उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करण्याचे आवाहन रामलिंगम यांनी केले. (वार्ताहर)