शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टेंवर गोळीबार

By admin | Updated: November 16, 2016 17:42 IST

अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. ही घटना रायगड जिल्ह्यातील पेण

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. ही घटना रायगड जिल्ह्यातील पेण – खोपोली मार्गावरील सापोलीजवळील एका हॉटेलबाहेर मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घटली. या घटनेत अंगरक्षकाच्या सतर्कतेमुळे अविनाश रामिष्टे या हल्ल्यातून बचावले. 
अविनाश रामिष्टे नागोठणे येथील सुप्रीम पेट्रोकेमिकल कंपनीमधील कार्यक्रम आटोपून परतत होते. त्यावेळी पेण-खोपोली रस्त्यावर हॉटेल योगीराजमध्ये ते जेवणासाठी थांबले होते. जेवण संपवून ते आपल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र अंगरक्षक सतर्क असल्यामुळे त्याने अविनाश रामिष्टे यांना बाजूला केल्याने  गोळी गाडीच्या समोरील काचेतून आरपार निघून गेली. या घटनेत अविनाश रामिष्टे थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. दरम्यान, या प्रकरणाची पोलीसांकडून चौकशी सुरु आहे.