शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पहिली महासभा नाट्यगृहात

By admin | Updated: June 11, 2017 03:12 IST

पनवेल शहर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष महापालिकेच्या पहिल्या महासभेकडे लागले आहे. पनवेल महापालिकेच्या नव्या इमारतीचे

- लोकमत न्यूज नेटवर्क

पनवेल : पनवेल शहर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष महापालिकेच्या पहिल्या महासभेकडे लागले आहे. पनवेल महापालिकेच्या नव्या इमारतीचे काम सुरू असल्याने पहिली-वहिली महासभा आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे. महापौर, उपमहापौरांच्या निवडीनंतरच महासभेची तयारी पार पडणार आहे. महापालिकेच्या २० प्रभागांतून एकूण ७८ नगरसेवक पनवेल महानगरपालिकेवर निवडून आले आहेत. भाजपाने पालिकेवर एकहाती सत्ता मिळवली असून, शेकापला विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. रायगड जिल्ह्यातील पहिल्या पनवेल महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. पनवेल नगरपरिषदेमार्फत निवडून आलेल्या अनेक अनुभवी नगरसेवकांचे पराभव झाल्याने स्वीकृत नगरसेवकपदाच्या माध्यमातून सभागृहात वाइल्ड कार्ड इंट्री घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. साधारणत: १५ तारखेनंतर पालिकेची महासभा पार पडेल. १५ तारखेपर्यंत रायगड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महापौर, उपमहापौर आदींच्या निवडणुका पार पडतील. पनवेल महापालिकेच्या पहिल्या महासभेत नव्याने नियुक्त झालेल्या नगरसेवकांची ओळख परेड, त्यांनतर विकासाचे मुद्दे, ध्येय धोरण, महापालिका मुख्यालय, नगरसेवकांच्या प्रभागात पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत अथवा सिडकोमार्फत रखडलेली कामे आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. महापौर, उपमहापौर, सभापती आदींना बसण्यासाठी सभागृह, कॅबिन यासंदर्भात पालिकेच्या वतीने निविदा काढण्यात आली असल्याची माहिती आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले. प्रश्न सोडविण्यासाठी मिनी महानगर चार प्रभाग समितीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात प्रभाग कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. ही कार्यालये मिनी महानगरपालिका म्हणून कार्यरत असतील. प्रभागांतील नागरिकांना प्रत्येक वेळी महानगरपालिकेत खेटे मारावे लागू नये, म्हणून आपल्या प्रभागातील समस्या नळजोडणीपासून ते ड्रेनेज समस्या, टॅक्स, पाण्याची समस्या आदींसह रहिवाशांच्या निगडित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक या मिनी महानगरपालिका कार्यालयातून होणार आहे.