नवी मुंबई : ऐरोली येथील वितरणच्या पॉवर हाऊसमध्ये आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. आगीमध्ये त्या ठिकाणचा ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला असून, थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. आगीचे कारण अद्याप निश्चित झाले नसून, सकाळी ती नियंत्रणात आली.ऐरोली येथील वीज वितरण विभागाच्या पॉवर हाऊसमध्ये ही आग लागलेली. आगीची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दलासह ठाणे, वाशी व सीबीडीच्या अग्निशमन दलाचे सहाहून अधिक बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याकडून फोमचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर सकाळच्या सुमारास आग आटोक्यात आली, परंतु शुक्रवारी दुपारपर्यंत त्या ठिकाणी कूलिंगचे काम सुरू होते. आगीचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग परिसरात पसरून मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. परंतु अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने मोठी संभाव्य दुर्घटना टळली. (प्रतिनिधी)
वीज वितरणच्या पॉवर हाऊसला आग
By admin | Updated: March 12, 2016 02:18 IST