शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

लाकडाच्या चार वखारींना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 02:02 IST

घणसोलीत सिलिंडरचा स्फोट

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : घणसोली  सेक्टर २५, दत्तनगर येथे असलेल्या लाकडाच्या तीन ते चार वखारींमध्ये एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी  दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली. यात एका कंपनीतील लाखो रुपयांचा मुद्देमाल खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना येथील आग आटोक्यात आणण्यास तब्बल दोन तास लागले. आगीचे नेमके कारण मात्र अस्पष्ट असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. घणसोली सेक्टर २५, दत्तनगर येथील भूखंड क्र. १४७, १४८, १४९, १५० आणि १५१ मध्ये लाकडाच्या वखारी आहेत. या ठिकाणी वखारीत काम करणारे मजूर कुटुंब राहतात. अचानक झोपड्यातील एका लहान सिलिंडरने पेट घेतल्याने या आगीची झळ शेजारील भूखंडालगतच्या केबलला लागल्याने आग वाढली. या आगीत भूखंड क्र. १४७  मधील कंपनीच्या मालक माला झा यांच्या कागद आणि प्लास्टिक  स्टिकर बनविण्याचा १० ते १५ लाख रुपयांचा कच्चामाल आगीत खाक झाला. आगीचे वृत्त कळताच माजी आमदार संदीप नाईक, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, मोनिका पाटील, हरिश्चंद्र वाघमारे, तसेच समाजसेवक किरण म्हात्रे यांनी सदर घटनेची पाहणी केली. या आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या तीन आणि रबाळे एमआयडीसीची एक अशा एकूण चार अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन तासांच्या आत आग आटोक्यात आणली.

जीवितहानी टळलीnआगीत दोन मजुरांचे संसार जळून खाक झाल्यामुळे त्यांना रस्त्यावर यावे लागले. गावी जाण्यासाठी जमा केलेले १० ते १५ हजार रुपये जळून गेले. nआगीचे वृत्त कळताच शेजारील झोपडपट्टी वस्तीवरील अनेक कुटुंबे जीव वाचविण्यासाठी पळत होती. nभूखंड क्र. १४७ वरील मोबाइल टॉवर या भीषण आगीपासून सुरक्षित राहिल्यामुळे जीवितहानी टळली. अनेक कामगार येथे काम करीत होते. 

टॅग्स :fireआग