शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

फायर फायटिंगचे धडे

By admin | Updated: April 21, 2016 02:53 IST

कळंबोली वसाहतीत अनेक गगनचुंबी इमारती आहेत. अशा उंच इमारतींमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी जिकिरीचे ठरते

कळंबोली : कळंबोली वसाहतीत अनेक गगनचुंबी इमारती आहेत. अशा उंच इमारतींमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी जिकिरीचे ठरते. आगीसारख्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी रहिवाशांनीही दक्ष राहाणे गरजेचे असते. याकरिता कळंबोली अग्निशमन केंद्राच्या वतीने उंच इमारतींतील रहिवाशांना नुकतेच आग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत माहिती व फायर फायटिंगचे धडे देण्यात आले. अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने हा उपक्र म हाती घेण्यात आला होता. कळंबोलीत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे. रोडपाली येथे टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. या गगनचुंबी इमारतींमध्ये फिक्स फायर फायटिंग यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे. ती बसविल्यानंतर त्याची सातत्याने तपासणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. असे असतानाही याबाबत फारशे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे आगीसारख्या घटना घडून मोठे नुकसान होते. खारघरमध्ये उंच इमारतींत अनेकदा आगीच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताहाचे निमित्त साधत कळंबोली अग्निशमन केंद्राच्या वतीने भूमी गार्डन, नील सिद्धी एमजीएम रुग्णालय, त्याचबरोबर इतर इमारतींमध्ये प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी आग कशामुळे लागते, ती कशी विझवायची, याबाबत येथील रहिवाशांना माहिती देण्यात आली. विशेषकरून याबाबत महिलांना अधिक जागृत करण्यात आले असल्याचे उप अग्मिशमक अधिकारी प्रतीक शिंदे यांनी सांगितले.नवीन पनवेल अग्निशमन केंद्रात प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांना आग विझविण्याबाबतची विविध प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. अग्निशमन दलाचे उपमुख्य अधिकारी विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहामध्ये जनजागृती केली असल्याचे कळंबोली केंद्राचे प्रमुख नानाभाऊ राठोड यांनी सांगितले.