शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमनची धुरा सफाई कामगारांवर

By admin | Updated: February 1, 2016 01:47 IST

सिडकोप्रमाणे पनवेल नगरपालिकेचेही अग्निशमन विभागाकडे दुर्लक्ष सुरू आहे. अग्निशमन दलाकडे फक्त दोनच वाहने असून एका वाहनाचा वापर परवानाच संपला आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईसिडकोप्रमाणे पनवेल नगरपालिकेचेही अग्निशमन विभागाकडे दुर्लक्ष सुरू आहे. अग्निशमन दलाकडे फक्त दोनच वाहने असून एका वाहनाचा वापर परवानाच संपला आहे. तीनच प्रशिक्षित कर्मचारी असून आग विझविण्यापासून सर्व कामे सफाई कामगारांनाच करावी लागत आहेत. आग विझविण्यासाठी सिडको व नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलावर अवलंबून राहावे लागत आहे. राज्यामधील सर्वात जुन्या नगरपालिकांमध्ये पनवेलचा समावेश होतो. नगरपालिकेला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. पूर्वी जुने वाडे व बैठ्या घरांच्या जागेवर आता ४ ते ७ माळ्यांच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. इमारतीची उंची वाढली असली तरी शहरात आग लागल्यास ती विझविण्यासाठी सक्षम यंत्रणाच तयार करण्यात आली नाही. नगरपालिका मुख्यालयासमोर झोपडीसारख्या खोलीत अग्निशमन दलाचे कार्यालय आहे. यामधील अर्धा भाग बांधकाम विभागासाठी व एक टेबल व तीन खुर्च्या बसतील एवढ्याच जागेत अग्निशमन केंद्राचे कार्यालय आहे. दीड शतकाच्या वाटचालीनंतर नगरपालिकेच्या ताफ्यात फक्त दोन आग विझविणारी वाहने आहेत. यामधील एक फायर इंजीन खूप जुने झाले असून त्याचा वापर परवानाच संपला आहे. एका छोट्या वाहनावर पूर्ण शहराची सुरक्षा अवलंबून आहे. शहरामध्ये मोठी आग लागली तर नगरपालिकेचे अग्निशमन दल ते विझवू शकत नाही. छोटी आग, साप पकडणे, अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करण्याचे काम या कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. चुकून मोठी आग लागली तर नवी मुंबई महानगरपालिका, सिडकोच्या कळंबोली व नवीन पनवेल अग्निशमन दलावर विसंबून राहावे लागत आहे. अग्निशमन दलामध्ये प्रशिक्षित कर्मचारीच नाहीत. सद्यस्थितीमध्ये अग्निशमन अधिकारी संतोष बेर्डे, अनिल जाधव व महेंद्र गायकवाड हे तीनच प्रशिक्षित कर्मचारी आहेत. आग कशी विझवायची, काय खबरदारी घ्यायची याविषयीचे रीतसर प्रशिक्षण या तिघांनी घेतले आहे. अग्निशमन दलामध्ये जवानांचे काम सफाई कामगारांना देण्यात आले आहे. सफाई कामगार आग विझविण्यापासून सर्व प्रकारची कामे करत आहेत. या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेने अद्याप योग्य प्रशिक्षणही दिलेले नाही. या सर्वांना आवश्यक त्या सुविधाही नाहीत. आग विझविताना अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे अग्निशमन दलामधील कर्मचाऱ्यांना विमा काढणे अत्यंत आवश्यक असते. परंतु सफाई कामगारांचा विमाही काढण्यात आलेला नाही. अग्निशमन दलाचे कार्यालय खुराड्याप्रमाणे आहे. तेथे जवानांना बसण्यासाठीही जागा नाही. तीन कर्मचारी खुर्चीवर बसू शकतात. उर्वरित कर्मचाऱ्यांना जमिनीवरच बसावे लागत आहे. पनवेलसारख्या आधुनिक शहरामध्येही अग्निशमन दलाची झालेली दुरवस्था व कर्मचाऱ्यांची गैरसोय पाहून शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडली व त्यामध्ये मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अग्निशमन दल सक्षम नसल्याने शहरवासीयांची सुरक्षा धोक्यात आहेच. याशिवाय अग्निशमन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षाही धोक्यात आहे. त्यांना अत्याधुनिक उपकरणे देण्यात आलेली नाहीत. बसण्यासाठी चांगले कार्यालय नाही. सफाई कामगारांकडून अग्निशमन विभागाचे काम करून घेतले जात आहे. त्यांना योग्य प्रशिक्षणही देण्यात आले नाही.