शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

बंद मॅफ्को मार्केटमध्ये आग

By admin | Updated: January 21, 2016 02:56 IST

तुर्भे येथील बंद स्थितीतल्या मॅफ्को मार्केटच्या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या

नवी मुंबई : तुर्भे येथील बंद स्थितीतल्या मॅफ्को मार्केटच्या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या मार्केटच्या इमारतीमधील थर्माकोल व डांबराच्या साठ्याने पेट घेतल्याने ही घटना घडली. मात्र आगीचे निश्चित कारण स्पष्ट झालेले नाही.राज्य शासनाच्या मॅफ्को मंडळाच्या तुर्भे येथील इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली. सन २००९ पासून मॅफ्को मार्केटची ही इमारत वापरात नसल्याने मोडकळीस आलेली आहे. रिक्त असलेल्या या इमारतीमध्ये बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या इमारतीमधून धूर येत असल्याचे लगतच व्यापार करणाऱ्या काही फेरीवाल्यांच्या निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी अग्निशमन दलाला देताच वाशी दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याचे स्पष्ट झाले. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात थर्माकोल व डांबराचा साठा केलेला होता. हे साहित्य पेटल्याने उग्र दुर्गंधी येवून परिसरात धुराचे लोट पसरत होते. परंतु आगीमुळे लगतच्या एपीएमसी मार्केटलाही धोका उद्भवण्यापूर्वीच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यावर नियंत्रण मिळवून संभाव्य दुर्घटना टाळली. (प्रतिनिधी)