शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग रुंदीकरण अंतिम टप्प्यात; कळंबोली-खांदा वसाहतीतील कामही युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:46 IST

कळंबोली ते शेडुंग महामार्ग क्र मांक ४ च्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुमारे १९७ कोटी खर्च करून करण्यात येणारे हे काम दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. रस्त्याच्या मार्गिका आणि पूल जवळपास तयार झाले आहेत.

- वैभव गायकरपनवेल : कळंबोली ते शेडुंग महामार्ग क्र मांक ४ च्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुमारे १९७ कोटी खर्च करून करण्यात येणारे हे काम दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. रस्त्याच्या मार्गिका आणि पूल जवळपास तयार झाले आहेत. कोन येथे द्रुतगती महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू केली आहे, त्यामुळे परिसरातील वाहतूककोंडी कमी झाली आहे. कळंबोली आणि खांदा वसाहतीतील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.कळंबोली, नवीन पनवेल, खांदा वसाहत, पनवेल, भिंगारी, काळुंद्रे, कोन या भागात नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. त्या तुलनेत वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या वाहतुकीसाठी रस्ते अरुंद पडत असल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. कळंबोली स्टील मार्केट, खांदा वसाहत, अजिवली येथे महामार्ग ओलांडताना अनेक पादचाऱ्यांचा बळी गेला आहे. भरधाव वेगाने जाणाºया वाहनांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागे, याशिवाय कळंबोली, खांदा वसाहत, तक्का, भिंगारी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी व्हायची. सुट्टीच्या दिवशी तर पळस्पे फाटा ते इलेव्हेंट रोड या दरम्यान येण्याकरिता कधी कधी एक तास खर्ची पडत होता. त्यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सरकारकडे करून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीची दखल घेत रस्ते विकास महामंडळाने वर्षभरापूर्वी काम हाती घेतले. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.ही आहेत कामेकळंबोली स्टील मार्केटलगत ६१.३७ कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. ९० टक्के काम पूर्णत्वास आले असल्याचे प्रकल्प अधिकारी प्रदीप दहातोंडे यांनी सांगितले.खांदा वसाहतीत भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. त्यामधून वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. या मार्गाच्या वर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याकरिता ३.४४ कोटी रु पये खर्च अपेक्षित आहे.कळंबोली ते पळस्पे फाटा या दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण जवळपास झाले आहे. त्याकरिता ५८.२९ कोटींचे बजेट होते, त्यामध्ये गाढी व काळुंद्रे नदीवरील पुलाचांही समावेश होता. पैकी गाढी नदीवर पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल