शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

अर्बन हाटमध्ये चित्रपट व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

By admin | Updated: June 2, 2017 05:55 IST

सिडको अर्बन हाटमध्ये समर फेस्टिव्हल सुरू असून, त्याअंतर्गत विद्यार्थ्यांकरिता विशेष उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले

नवी मुंबई : सिडको अर्बन हाटमध्ये समर फेस्टिव्हल सुरू असून, त्याअंतर्गत विद्यार्थ्यांकरिता विशेष उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून येत्या शनिवारी ३ जूनपासून चित्रपट व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १५ विविध राज्यांमधील उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे. या महोत्सवांतर्गत शनिवारी ट्रू लव्ह स्टोरी आणि गुड मॉर्निंग मुंबई हे चित्रपट दाखविले जाणार आहेत. रविवारी ४ जून रोजी ज्येष्ठ नागरिकांकरिता दादा-दादी दिवस साजरा केला जाणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना निरोगी आरोग्य, संतुलित आहार आणि आनंदी आयुष्य याविषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. या वेळी संध्याकाळी संगीत मैफलीचेही आयोजन केले जाणार आहे. सोमवार, ५ जून रोजी कथ्थक नृत्याविष्कार सादर केले जाणार असून त्यानंतर चित्रपट दाखविला जाणार आहे. मंगळवार, ६ जून रोजी बच्चेकंपनीकरिता खास चित्रपट दाखविले जाणार आहे. तसेच गुजराती नृत्याविष्कार पाहण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळणार आहे. बुधवार, ७ जून ते शुक्रवार, ९ जूनपर्यंत विविध मनोरंजनपर कार्यक्रम सादर केले जाणार आहे. यामध्ये दर्जेदार चित्रपट दाखविले जाणार आहेत. शुक्रवार, ९ जून रोजी लावणी आणि लेझीम सादर केले जाणार आहे, तर शनिवार, १० जूनला रसिकांकरिता नृत्य व संगीताचे विशेष सादरीकरण केले जाणार आहे. या महोत्सवादरम्यान खाद्यप्रेमींकरिता फूड स्टॉल्स याठिकाणी राहणार असून विविध राज्यातील पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.