शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

हिरानंदानीची फाईल गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 02:32 IST

महापालिकेच्या सुपरस्पेशालिटी उपचाराचा घोळ अद्याप सुटलेला नाही. वादग्रस्त हिरानंदानीच्या कराराविषयीची महत्त्वाची कागदपत्रेच सापडत नसल्याचे स्पष्ट झाले असून

नवी मुंबई : महापालिकेच्या सुपरस्पेशालिटी उपचाराचा घोळ अद्याप सुटलेला नाही. वादग्रस्त हिरानंदानीच्या कराराविषयीची महत्त्वाची कागदपत्रेच सापडत नसल्याचे स्पष्ट झाले असून, कागदपत्रे हरविली की मुद्दाम गायब केली याविषयी शंका व्यक्त होत आहे. शहरवासीयांना मोफत सुपरस्पेशालिटी उपचार मिळावे यासाठी वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयाचा काही भाग हिरानंदानी सुपरस्पेशालिटी रूग्णालयास अल्प भाडेतत्त्वावर दिला आहे. हिरानंदानीने सदर रूग्णालय फोर्टीजला विकले. यामुळे अनेक वर्षांपासून हा प्रश्न वादग्रस्त ठरला आहे. शहरवासीयांना सुपरस्पेशालिटीचा फारसा लाभ होत नाही. येथील उपचार परवडत नसल्याने गरीब रूग्णांनी तेथे जाणेच बंद केले होते. पालिकेने सिडकोच्या कराराचा भंग केला असल्यामुळे सदर भूखंड ताब्यात घ्यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यांनी पालिकेकडे याविषयीच्या कराराची माहितीही मागविली होती. परंतु पालिकेने निविदा मागवितानाच्या मूळ नस्ती व इतर महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे स्पष्ट केले आहे. पालिकेमधील कागदपत्रे गहाळ कशी होवू शकतात, जाणीवपूर्वक कोणीतरी ती नष्ट केली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.