शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

न्याय हक्कासाठी अपंगाचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:34 IST

पदवीधर प्रकल्पग्रस्त अपंगाला जेएनपीटीने १९९८ पासून आश्वासन देवूनही आजतागायत नोकरीवर सामावून घेण्यास दिरंगाई चालविली आहे. जेएनपीटीने चालविलेल्या अन्यायाविरोधात अपंग जेएनपीटी प्रकल्पग्रस्त दिलीप घरत

उरण : पदवीधर प्रकल्पग्रस्त अपंगाला जेएनपीटीने १९९८ पासून आश्वासन देवूनही आजतागायत नोकरीवर सामावून घेण्यास दिरंगाई चालविली आहे. जेएनपीटीने चालविलेल्या अन्यायाविरोधात अपंग जेएनपीटी प्रकल्पग्रस्त दिलीप घरत यांनी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून उपोषणाला सुरुवात केली आहे.नवीन शेवा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जे. पी. म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जगजीवन भोईर, ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झालेआहेत.जेएनपीटीने बंदरासाठी जमिनी संपादन करताना घरटी एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर पदवीधर प्रकल्पग्रस्त असलेले दिलीप धनाजी घरत यांनाही १९९८ पासून २०१७ दरम्यान कामावर घेण्यासाठी फक्त आश्वासनेच दिली आहेत. तसेच न्याय मागणीसाठी याआधीही उपोषणही केले आहे. नोकरीत सामावून घेण्याच्या लेखी आश्वासननंतरच त्यावेळी उपोषण मागे घेण्यात आले होते.मात्र त्यानंतरही आश्वासनांची पूर्तता अद्याप केलेली नाही. १९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला नसल्याच्या निषेधार्थ धनाजी घरत या पदवीधर अपंगाने न्याय हक्कासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.जागतिक अपंग दिनाच्या दिवशीच जेएनपीटी प्रशासन भवनासमोरच सुरू केलेल्या दिलीप घरत यांच्या उपोषणाला उरण परिसरातूनही वाढता पाठिंबा मिळत आहे.

जेएनपीटीविरोधात उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती खालावलीउरण : जेएनपीटी बंदरअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदरातील नोकरभरती आणि मच्छीमारांना आर्थिक नुकसानभरपाई मिळावी या मागणीकरिता रविवारपासून जेएनपीटीविरोधात पाणजे गावातील महिलांनी सुरू केलेल्या काही उपोषणकर्त्यांची प्रकृ तीखालावत चालली आहेत.तिसºया दिवशी रामीबाई पाटील (५८) यांना जेएनपीटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ज्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे त्या अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या तालुका अध्यक्ष कलावती भोईर यांचीही प्रकृती खालावत आहे. त्या चक्कर येवून पडल्याने आणि शुगर वाढल्याने सोमवारी क ोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोलीचे वैद्यकीय अधिकाºयांनी न्हावा शेवा बंदर पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांसमक्ष कलावती भोईर व त्यांच्या समवेत असलेल्या १६ महिला उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली असल्याची माहिती न्हावा शेवा बंदर पोलीस ठाण्यातून देण्यात आली. उपोषणकर्त्यांची जेएनपीटी अधिकाºयांनी अद्यापही दखल घेतली नसल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले.