शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिका मुख्यालयाच्या पायरीवर महिलेची प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:26 IST

माता-बाळ दोघेही सुखरूप; रुग्णालयात उपचार सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका मुख्यालयाच्या पायरीवर एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना शनिवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास घडली. अनिला समीर ठाक (२२) असे या महिलेचे नाव आहे.प्रसूतीच्या वेदना होत असल्याने अनिला जिल्हा रुग्णालयात येण्यास निघाल्या. दरम्यान, ज्या रिक्षाने त्या उपजिल्हा रुग्णालयात येण्यास निघाल्या त्या रिक्षा चालकाला पालिका रुग्णालयात रिक्षा घेऊन चला असे या ठाक दाम्पत्याने सांगितले. रिक्षाचालकाला देखील याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने रिक्षाचालकाने रिक्षा थेट पालिका मुख्यालयाजवळ आणला. दरम्यान, मुख्यालयात उतरताच क्षणी पायऱ्यांवर चढताना अनिला ठाक यांच्या प्रसूती वेदना तीव्र झाल्याने काही क्षणातच अनिलाने पायरीवरच एका मुलीला जन्म दिला. मुख्यालयातील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला माहिती दिली. मात्र रुग्णवाहिकेतील वाहनचालक जागेवर नसल्याचे समजले. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना याबाबत माहिती मिळताच डॉक्टर व परिचारिकेने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, डॉक्टरांनी त्वरित जन्मलेल्या बाळाची नाळ कापून आई व बाळाला रुग्णालयात हलविण्यास सांगितले. यावेळी पालिकेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जीवन कोंडिलकर यांनी त्वरित गाडीने नवजात मुलीला रुग्णालयात दाखल केले.आम्ही त्वरित माता व बाळावर प्राथमिक उपचार सुरू केले आहेत. दोघांची प्रकृ ती उत्तम आहे.- डॉ. नागनाथ यम्पल्ले, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पनवेलशासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरू केली. मात्र उपजिल्हा रुग्णालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पालिका मुख्यालयात ही रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध होवू शकली नाही. वाहनचालकच नसल्याने हा प्रकार घडल्याने संबंधित वाहनचालकावर कारवाईची मागणी केली जात आहे.

टॅग्स :panvelपनवेलMuncipal Corporationनगर पालिका