शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खोक्यांमुळे आग लागण्याची भीती

By admin | Updated: May 6, 2016 00:33 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये अनधिकृत खोकी व बॉक्स विके्रत्यांचे प्रमाण वाढत आहे. मोकळ्या जागेसह मार्केटबाहेरील रोडवरही अतिक्रमण केले आहे. कामगार विड्या

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये अनधिकृत खोकी व बॉक्स विके्रत्यांचे प्रमाण वाढत आहे. मोकळ्या जागेसह मार्केटबाहेरील रोडवरही अतिक्रमण केले आहे. कामगार विड्या व सिगारेट ओढत असल्याचे चित्र पहावयास मिळत असून, त्यामुळे मार्केटला आग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बाजार समितीमध्ये आंबा हंगाम सुरू झाला की मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त होते. अनधिकृत फेरीवाले, परप्रांतीय कामगार, अनधिकृत खोके विक्रेते बिनधास्तपणे येथे वावरत असतात. रोज तब्बल ४०० ते ४५0 वाहनांमधून आंबा येथे विक्रीसाठी येत असतो. या आंब्यांच्या पॅकिंगसाठी मार्केटमध्ये अनेक ठिकाणी लाकडाची खोकी तयार करण्याचा व्यवसाय सुरू झाला आहे. १० ते १५ फूट उंच खोक्यांचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. मार्केटमधील जागा कमी पडू लागल्यामुळे आता तुर्भे ते सीडब्ल्यूसी गोडावूनकडे जाणाऱ्या रोडवरही खोकी ठेवली जात आहेत. मार्केटमध्ये काम करणारे बहुतांश परप्रांतीय कामगार धूम्रपान करतात. विड्या व सिगारेट ओढून ती तेथील गवत व लाकडावरच टाकले जाते. यामुळे आग लागून पूर्ण मार्केट जळून खाक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणसह कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातवरून आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. येथे हजारो कामगार काम करत आहेत. दिवाळीत मसाला मार्केटमध्ये आग लागली होती. त्याप्रमाणे फळ बाजारामध्येही आग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून मुंबई एपीएमसीची ओळख आहे. परंतु या मार्केटमध्ये कुठेच आग विझविण्याची यंत्रणा नाही. फळ मार्केटमध्ये आंबा हंगामामध्ये आग लागली तर अग्निशमन विभागाची गाडी जाण्यासही जागा नाही. मार्केटमध्ये सर्वत्र गवताचे व खोक्यांचे ढिगारे असल्याने पूर्ण मार्केट जळून खाक होवू शकते. अग्निशमन विभागाने यापूर्वीही बाजार समितीला वारंवार नोटीस दिली आहे. परंतु व्यापारी व प्रशासन सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेचेही अभय खोके विक्रेत्यांनी फळ मार्केटच्या बाहेर रोडवरही दुकाने थाटली आहेत. दोन मार्गिका विक्रेत्यांनी अडविल्या असून वाहतुकीसाठी एकच मार्गिका उपलब्ध आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन संबंधितांवर कडक कारवाई करत नसल्याने पालिकेच्या आशीर्वादानेच हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.