शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:51 IST

सामाजिक संघटनांचा सहभाग; नवी मुंबईमध्ये सह्यांची मोहीम

नवी मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी नवी मुंबईमधील साहित्यप्रेमी नागरिकांनी वाशीतील शिवाजी चौकात उपोषण केले. या प्रश्नाकडे शहरवासीयांचेही लक्ष जावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून सह्यांची मोहीमही सुरू करण्यात आली आहे.ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील २७ संघटनांचे ‘मराठीच्या भल्यासाठी’ नावाचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून व इतर साहित्यप्रेमी संस्थांच्या वतीनेही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी चळवळ उभी केली जात आहे. याचाच भाग म्हणून नवी मुंबईमधून एक लाख नागरिकांच्या सह्या घेऊन निवेदन तयार केले जाणार आहे. आतापर्यंत १८ हजार जणांच्या सह्या झाल्या आहेत. मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे पदाधिकारी व इतर नागरिकांनी गुरुवारी वाशीतील शिवाजी चौकामध्ये एक दिवसाच्या उपोषणाचे आयोजन केले होते. मराठी भाषेसाठीची चळवळ सर्वांपर्यंत पोहोचवावी. यासाठी सुरू असलेल्या चळवळीमध्ये सर्वांचे योगदान मिळावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.उपोषणामध्ये सुभाष कुलकर्णी, नीलेश पालेकर, परशुराम ठाकूर, मधुकर राऊळ, माधव ठाकूर, दिनकर नवरे, काळुराम वरे, दीपक पाटील, प्रवीण पडवळकर, सुभाष बागवे व इतर मान्यवर सहभागी झाले होते.