शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नैनाविरोधात शेतकऱ्यांची सिडकोवर धडक, प्रकल्प रद्द करण्याची केली मागणी

By कमलाकर कांबळे | Updated: March 23, 2023 19:05 IST

सिडकोच्या नैना प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.

नवी मुंबई: सिडकोच्या नैना प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. तो रद्द करावा या मागणीसाठी २३ गावांतील ग्रामस्थांनी गुरुवारी लाँग मार्च काढून सिडकोवर धडक दिली. नैना प्रकल्पबाधीत शेतकरी उत्कर्ष समितीच्या बॅनरखाली महाविकास आघाडीसह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.

यामुळे सायन-पनवेल महामार्गावरही काही काळ कोंडी झाली होती. परंतु, शेतकर्यांनी शिस्तीचे दर्शन घडविल्यामुळे पोलिसांवरील मोठा ताण दूर झाला.सिडकोच्या माध्यमातून नैनाच्या पहिल्या टप्प्यात २३ गावांचा समावेश करून पायलट प्रोजेक्ट उभारला जात आहे. मात्र, येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा नैनाला विरोध आहे. त्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून विविध स्तरावर आंदोलने केली जात आहे. गावोगावी बैठका घेवून नैना प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी आणि ग्रामस्थांत जनजागृती केली जात आहे.

त्याचप्रमाणे २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत प्रत्येक गावात एक दिवस बंद पाळण्यात आला. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात नैना हटविण्याबाबत काही तरी निर्णय होईल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. मात्र यासंदर्भात काहीच निर्णय न झाल्याने नैना प्रकल्पबाधीत उत्कर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारी पनवेल ते बेलापूर येथील सिडकोभवनपर्यंत निषेध रॅली काढली. उत्कर्ष समितीच्या शिष्टमंडळाने सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांची भेट घेवून नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.

यासंदर्भात शिष्टमंडळाने राजेश पाटील यांना सविस्तर निवेदनही दिले आहे. या शिष्टमंडळात माजी आमदार बाळाराम पाटील, ॲड. सुरेश ठाकूर, वामन शेळके, राजेश केणी, बबन पाटील, सुदाम पाटील, अनिल ढवळे आदींचा समावेश होता. दरम्यान, नैना प्रृकल्प रद्द न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिष्टमंडळातील नेत्यांनी सिडकोला दिला आहे.