शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पनवेल मधील भात विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी; 789 शेतकऱ्यांच्या मार्फत 9765 क्विंटल भात जमा

By वैभव गायकर | Updated: January 5, 2024 16:21 IST

तालुक्यात शेतकरी सहकारी खरेदी-विक्री केंद्र पनवेल मार्केट यार्ड येथे पनवेल उरण या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.

वैभव गायकर

पनवेल : तालुक्यात शेतकरी सहकारी खरेदी-विक्री केंद्र पनवेल मार्केट यार्ड येथे पनवेल उरण या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. मोठ्या प्रमाणात भात खरेदी करून ठेवण्यास गोदामे अपुरी पडत असल्याने भात खरेदीला मर्यादा आल्या आहेत.या केंद्रात 9765 क्विंटल भात अद्याप पर्यंत गोळा झाला आहे. नोंदणी केलेल्या 1132 शेतकऱ्यांपैकी 789 शेतकऱ्यांनी आपला भात या केंद्रात जमा केला आहे.होणारी गर्दी टाळण्यासाठी क्रमाक्रमाने शेतकऱ्यांना या केंद्रावर बोलाविण्यात येत आहे.यंदा देखील मुसळधार पावसाचा फटका काही शेतकऱ्यांना बसला असल्याने भाताचे उत्पादन घटले आहे.यंदा शासनातर्फे 2183 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला आहे.मागील वर्षी हा भाव 2040 रुपये एवढा होता.789 शेतकऱ्यांमध्ये उरणचे 240 आणि पनवेलच्या 549 शेतकऱ्यांचा समावेश आहे.मागील वर्षी 31385 क्विंटल भाताचे उत्पादन झाले होते.अतिवृष्टीमुळे यंदा भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.मात्र अद्यापही शेतक-यांच्या माध्यमातून भात विक्री शिल्लक असल्याने नेमका किती भाताचे उत्पादन घटले हे शेवटी समजणार आहे.शासनाने यावर्षी चांगला भाव देऊ केला आहे मात्र अतिवृष्टीमुळे तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकरी चंद्रकांत भगत यांनी  दिली.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत.यावर्षी 1132 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असुन टप्प्याटप्प्याने या शेतकऱ्यांकडून भात खरेदी केली जात आहे.- रवींद्र पाटील (चेअरमन,सहकारी भात खरेदी केंद्र ,पनवेल )