शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

माथाडींच्या घरांना असुविधांचा फास

By admin | Updated: January 16, 2016 00:36 IST

सिडकोने माथाडी कामगारांना घरासाठी वितरीत केलेल्या ४७१ ओट्यांसाठी मलनिस्सारण वाहिन्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरांसाठी ओट्यांची आखणी करताना सुमारे

नवी मुंबई : सिडकोने माथाडी कामगारांना घरासाठी वितरीत केलेल्या ४७१ ओट्यांसाठी मलनिस्सारण वाहिन्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरांसाठी ओट्यांची आखणी करताना सुमारे ३० वर्षांपूर्वी सिडकोने मलनिस्सारण वाहिन्या बसवल्या आहेत. मात्र सध्या त्या नादुरुस्त स्थितीत असल्याने ओटे वितरीत होऊनही त्यावर घर बांधणीला घरघर लागली आहे.मुंबईतील बाजारपेठ नवी मुंबईत स्थलांतरित झाल्यानंतर त्या ठिकाणी काम करणाऱ्या माथाडी कामगारांसाठी घराचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी माथाडी कामगारांच्या संघटनांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सिडकोकडून माथाडी कामगारांसाठी घरे मंजूर करून घेतली. त्यानुसार १९९३ साली ५ हजार, तर १९९९ साली ४९० घरे माथाडींना प्राप्त झालेली आहेत. त्याचवेळी मंजूर झालेल्या घरांपैकी उर्वरित ४७१ घरांच्या ओट्याचे वाटप गतवर्षी सिडकोने केले आहे. कोपरखैरणे व लगतच्या परिसरात सिडकोने माथाडींना हे घराचे ओटे दिले आहेत. त्याची हस्तांतरण प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून, अनेकांनी प्राप्त झालेल्या ओट्यांवर घराच्या बांधणीला सुरुवात केली आहे. याचवेळी त्यांच्यापुढे मलनिस्सारण वाहिन्यांचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. रिकाम्या ओट्यांवर घर बांधताना त्याला मलवाहिनी जोडायची कोणी, असा प्रश्न ओटेधारकांना पडला आहे. नगरसेवक शंकर मोरे यांनी यासंबंधी स्थायी समितीमध्ये प्रश्न उपस्थित करून त्याचे गांभीर्य व्यक्त केले. वसाहतीअंतर्गतची कामे करण्याला महापालिकेने नकार दिला आहे. तर सिडकोने ओटे वितरीत करून त्यांची जबाबदारी झटकली आहे. यामुळे मलवाहिन्यांचे काम करायचे कोणी, असा प्रश्न असल्याचेही मोरे यांनी सांगितले. एकीकडे शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे, आवश्यक ठिकाणी झोपडपट्टी परिसरात शौचालये बांधली जात आहेत, मात्र दुसरीकडे घरांसाठी आवश्यक असलेल्या मलवाहिन्यांची जबाबदारी प्रशासन झटकत आहे. यामुळे माथाडी कामगारांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. शिवाय मलवाहिन्या बसवण्याच्या कामात दिरंगाई अथवा हलगर्जी झाल्यास नागरी आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो. यामुळे प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी नगरसेवक शंकर मोरे यांनी गुरुवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत केली. त्यानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी कोपरखैरणे परिसरात सिडकोने वितरीत केलेल्या ओट्यांची पाहणी केली. (प्रतिनिधी)सिडकोने सुमारे ३० वर्षांपूर्वी या ओट्यांची आखणी केलेली आहे. परंतु वितरणाअभावी वर्षानुवर्षे हे ओटे मोकळेच पडून होते. यामुळे काही ठिकाणी डेब्रिजचे ढीग तर काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ओट्यांचे वितरण करण्यापूर्वी सिडकोने त्यावरील अतिक्रमण हटवणे गरजेचे होते. मात्र जसे आहेत तशा स्थितीत सिडकोने या ओट्यांचे माथाडी कामगारांना हस्तांतरण केले आहे.