शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:38 IST

पनवेल महानगरपालिकेला भेडसावणारी पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहरी भागात काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरळीत होत असला, तरी ग्रामीण भागात मात्र पाण्याचे दुर्भिक्ष नर्माण झाले आहे

वैभव गायकर पनवेल : पनवेल महानगरपालिकेला भेडसावणारी पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहरी भागात काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरळीत होत असला, तरी ग्रामीण भागात मात्र पाण्याचे दुर्भिक्ष नर्माण झाले आहे. पाण्याच्या भीषण टंचाईचा फटका ग्रामीण भागातील गावांना आणि आदिवासीपाड्यांना बसला आहे. त्यामुळे या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.पनवेल महापालिकेत २९ महसुली गावांचा समावेश आहे. या ग्रामीण भागात आदिवासीपाड्यांचाही समावेश आहे. संपूर्ण पनवेल महापालिकेला दररोज २५० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे; परंतु यापैकी फक्त १८० एमएलडी पाणी महापालिका क्षेत्राला मिळते. ग्रामीण भागाची मागणी २० एमएलडी असताना, प्रत्यक्षात केवळ १० एमएलडी पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. या ग्रामीण भागात आदिवासीपाड्यांची अवस्था तर आणखीनच बिकट आहे. बोअरवेल किंवा डोंगराच्या पायथ्याची खोदलेल्या खड्ड्यातून आदिवासी बांधवांना पाणी भरावे लागत आहे. त्यातच विहिरी, खड्डे यामधील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे आदिवासी बांधव हतबल झाले आहेत. सिडको तसेच पनवेल महापालिकेचेही या आदिवासीपाड्याकडे सपशेल दुर्लक्ष होत चालले आहे. आमच्या यातना सांगाव्या तरी कोणाला, अशी भावना आदिवासी बांधव व्यक्त करीत आहेत. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक-३मधील धामोळे आदिवासीवाडीला सर्वात जास्त पाण्याच्या यातना सोसाव्या लागत आहेत. एकीकडे भव्य असे गोल्फ कोर्स, २४ तास गवतावर पाण्याचे फवारे आणि दुसरीकडे दुष्काळ सदृश स्थिती अशी परिस्थिती धामोळे आदिवासीपाड्यात निर्माण झाली आहे. या ठिकाणी सिडकोमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, त्यामध्ये अनियमितता असल्यामुळे भरउन्हात येथील महिलांना पाण्यासाठी शहरभर भटकंती करावी लागत आहे. शहरातील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा झाल्यास ते सिडको व पालिकेवर मोर्चे काढतात; परंतु आम्ही हे करू शकत नाही, कारण आमचे हातावर पोट आहे. एक दिवस सुट्टी केली तरी घरच्या चुली पेटणार नाहीत, अशी खंत बाळाराम पारधी या युवकाने ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे. खारघरमधील घोळवाडी आदिवासीवाडीतही हीच समस्या आहे. या वाडीतून मंजुळा कातकरी या नगरसेविका निवडून आल्या आहेत.ग्रामीण भागात पडघे गावाला या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीने महिनाभरापूर्वी या ठिकाणी पाणीकपात केली असल्याने येथील ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, पालिकेमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना नियमितता नसल्याने गावात पाणीसमस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक विष्णू जोशी यांनी व्यक्त केली आहे.या परिसरात टेंभोडे, वळवली या गावांतदेखील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. अनेकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, येथील वार्घ्याची वाडी आदिवासीवाडीतही पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे.५00पेक्षा जास्त बोअरवेल, विहीर निरुपयोगीपडघे, वळवली, टेंभोडे या परिसरात ५00पेक्षा अधिक बोअरवेल व विहिरी आहेत; परंतु तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणामुळे बोअरवेल व विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. या पाण्यातून उग्र वास येत असल्याने हे पाणी पिण्यायोग्य नाही. एकूणच या परिसरात असलेल्या पाचशेपेक्षा अधिक बोअरवेल आणि विहिरी निरुपयोगी ठरल्या आहेत.