शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांची पिळवणूक; कर्मचारी संघटनेचा आरोप

By नामदेव मोरे | Updated: October 9, 2023 17:20 IST

न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

नवी मुंबई : उद्यान विभागातील कामगारांची पिळवणूक केली जात आहे. नियमापेक्षा कमी कामगारांची नियुक्ती केली आहे. सर्वांना किमान वेतन दिले जात नाही. नाकाकामगारांकडून कमी पैशांमध्ये कामे करून घेतली जात आहेत. उद्यान विभागातील कामकाजाची निष्पक्ष चौकशी करावी. गैरव्यवहार करणारांवर कारवाई करावी. आमचे आक्षेप व आरोप खोटे असतील तर आमच्यावर कारवाई करा असे आव्हानही समाज समता कामगार संघटनेने दिले आहे.

कामगारांच्या १४ प्रमुख मागण्यांसाठी समाज समता संघ संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य झाल्या नसल्यामुळे सहाव्या दिवशीही मनपा मुख्यालयासमोर कामगारांनी ठिय्या मांडला आहे. उद्यान विभागाच्या कामकाजावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. उद्यानाची देखभाल करण्यासाठी नियमाप्रमाणे आवश्यक कामगारांची नियुक्ती केलेली नाही. उपलब्ध कामगारांपैकी सर्वांना किमान वेतन नियमाप्रमाणे वेतन दिले जात नाही. काहींना किमान वेतन दिल जात आहे. नाका कामगारांकडून काम करून घेतले जात असून त्यांना किमान वेतन दिले जात नाही. कमी कामगारांकडून जास्त काम करून घेतले जात आहे. २०२० पासून राहणीमान भत्यातील थकीत रक्कम देण्यात आलेली नाही.

बोनस, रजेचा पगार, भविष्यनिर्वाह निधी, राज्य कामगार विमा योजनेची थकबाकी दिली जात नाही. उद्यान देखभालीच्या कामामध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही संघटनेचे अध्यख गजानन भोईर, सरचिटणीस मंगेल लाड यांनी केला आहे. जो पर्यंत कामगारांच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत व उद्यान विभागातील कामाची चौकशी होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.

आम्ही केलेल्या आरोपांची चौकशी करावी. आरोप सत्य असतील तर संबंधीत दोषींवर कारवाई करावी. आमचे आरोप खोटे असतील तर आमच्यावर कारवाई करावी.मंगेश लाड, सरचिटणीस समाज समता कामगार संघ

उद्यान विभागातील सर्व कामगारांना किमान वेतन व सवलती मिळाल्या पाहिजे. अनेक कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.गजानन भोईर, अध्यक्ष - समाज समता कामगार संघ

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई