शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खर्चाचे गणित जुळवताना उमेदवारांची कसरत

By admin | Updated: May 9, 2017 01:23 IST

निवडणूक आयोगाने पनवेल महानगरपालिकेची खर्च मर्यादा ५ लाख अशी आखून दिली आहे. त्याप्रमाणे कागदावर गणित जुळविण्याकरिता

अरुणकुमार मेहत्रे। लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : निवडणूक आयोगाने पनवेल महानगरपालिकेची खर्च मर्यादा ५ लाख अशी आखून दिली आहे. त्याप्रमाणे कागदावर गणित जुळविण्याकरिता उमेदवारांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत निवडणूक विभागाची करडी नजर असल्याने सर्वांनीच धसका घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून खर्चाचे गणित सोडविण्यासाठी खास व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांना वेगवेगळ्या मर्यादा घातलेल्या आहेत. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पडतो. त्याचबरोबर मतदारांना प्रलोभने दाखवली जातात. यामुळे ही प्रक्रि या निरपेक्ष होत नसल्याने गेल्या काही वर्षांत याकरिता आचारसंहिता आखून देण्यात आली आहे. तसेच त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी यावेळी निवडणूक आयोगाने खास अंमलबजावणी पथक ठिकठिकाणी नियुक्त केले आहे. पनवेल महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी होत आहे. त्यानुसार आयोगाने निवडणूक खर्चावर कमालीची मर्यादा आणली आहे. अतिशय कमी असलेल्या खर्चात निवडणुका लढविणे अतिशय कठीण आहे. पैसे खर्च केल्याशिवाय कार्यकर्ते सुध्दा प्रचारात सहभागी होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या मर्यादा कागदावर राहतील अशी स्थिती आहे. परंतु या निवडणुकीत काटेकोर अंमलबजावणी झाल्यास उमेदवारास निवडणूक लढणे अवघड होणार आहे. विविध खर्चाचा हिशेब ठेवून तो निवडणूक नियमांच्या चौकटीत बसवण्यासाठी काही उमेदवारांनी खास हिशेबनीस नियुक्त केले आहे. काही जण सीएचा सल्ला घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.होर्डिंग्ज, वाहनभाडे, झेंडे, बॅनर, मतदानचिन्ह, व्यासपीठ, पत्रके, बुथ प्रतिनिधींचे मानधन, अशा उघड खर्च दिसणाऱ्या बाबींचा खर्च तेवढा उमेदवार दाखवून नियमांचे पालन करण्याच्या प्रयत्नात आहेत. महागाईच्या काळात खर्च व मतदारांना दाखवण्यात येणारी प्रलोभने लक्षात घेतल्यास काही उमेदवारांचा खर्च कोटींपर्यंत जाऊ शकतो. मात्र कागदावर सर्व काही नियमानुसार दाखवावे लागणार आहे.